शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

माणमधील ग्रामपंचायत निवडणुकांवर नेत्यांचे लक्ष ! नेते सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 12:36 IST

Grampanchyat Samiti Satara- माण तालुक्यातील निवडणूक रिंगणातील ६१ ग्रामपंचायतींपैकी १४ गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्या तरी उर्वरित ४७ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोमाने सुरू असून, अंतिम टप्प्यात आहे. पक्षीय राजकारण ग्रामपंचायतस्तरावर केले जात नसल्याच्या कितीही वल्गना केल्या जात असल्या तरी भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गटबांधणीसाठी या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत.

ठळक मुद्देमाणमधील ग्रामपंचायत निवडणुकांवर नेत्यांचे लक्ष ! ग्रामपंचायत निवडणुका राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठरणार

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील निवडणूक रिंगणातील ६१ ग्रामपंचायतींपैकी १४ गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असल्या तरी उर्वरित ४७ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोमाने सुरू असून, अंतिम टप्प्यात आहे. पक्षीय राजकारण ग्रामपंचायतस्तरावर केले जात नसल्याच्या कितीही वल्गना केल्या जात असल्या तरी भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गटबांधणीसाठी या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत.माण तालुक्यात ९५ गावांपैकी पहिल्या टप्प्यात ६१ ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. यापैकी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या व सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या अनेक ग्रामपंचायती असून एकूण ४७ गावांच्या निवडणुका लागल्या आहेत. राजकीयदृष्टीने निम्मा तालुका आपल्या वर्चस्वाखाली असला पाहिजे, या भावनेतून सर्वच राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींनी या निवडणुकीत लक्ष घातले आहे.

कोणता पक्ष-पार्टी या अटीतटीच्या निवडणुकीत बाजी मारणार? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. पूर्वी गावातील गटा-तटाच्या होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत अलीकडच्या काळात पक्षीय राजकारण शिरल्याचे निदर्शनास येत आहे.

आपल्या विचारांंच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळावी, गाव ताब्यात असल्याने विकासकामाच्या निमित्ताने लोकांशी चांगला संपर्क राहतो. आपल्या विचारांचे कार्यकर्ते, आपला गट मजबूत होतो. त्यामुळे भविष्यातील सर्वच निवडणुका सोप्या होऊन जातात. या दृष्टिकोनातून प्रत्येक राजकीय पक्षातील मुख्य नेतेमंडळी ग्रामपंचायत निवडणुकीत आपापल्या कार्यकर्त्यांना राजकीय बळ देताना दिसत आहेत.बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार केला असता, ग्रामपंचायत निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष या निवडणुकीला गांभीर्याने घेत असल्याचे दिसत आहेत.गट मजबूत करण्यासाठी नेतेमंडळी सरसावलेमाण तालुक्याची राजकीय पार्श्वभूमी तपासली असता काही ग्रामपंचायतींवर काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. तर काही ग्रामपंचायतींवर भाजपा आमदार जयकुमार गोरे, शिवसेनेचे शेखर गोरे, अनिल देसाई यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे आपापला गट मजबूत करण्यासाठी नेतेमंडळी सरसावले आहेत. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकSatara areaसातारा परिसर