शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी राजकीय डावपेचांची आखणी

By admin | Updated: April 15, 2015 23:57 IST

कातरखटाव गटात राजकीय वारे : निवडणुका लांबल्यामुळे गावपुढाऱ्यांना दिलासा

कातरखटाव : कातरखटाव व परिसरातील कोणतीही प्राथमिक तयारी नसताना ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख तोंडावर येऊन आदळल्याने गांगरून गेलेल्या गाव कारभाऱ्यांना निवडणुका पुढे गेल्यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे उर्वरीत काळात डावपेच आखून निवडणुकीची जोरदार तयारी करण्याचे बेत गावोगावचे गावकारभारी आखत आहेत. जून-जुलैमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे रणागंण आतापासून तापवायला सुरुवात झाली आहे. कातरखटाव गटातील कातरखटावसह, बोंबाळे, दाळमोडी, एनकूळ, कणसेवाडी, मानेवाडी, तुपेवाडी, येरळवाडी, डाभेंवाडी या सर्व ग्रामपंयतींच्या निवडणुका अपेक्षित आहेत. अशा परिस्थितीत अद्याप सरपंचपदाचे आरक्षण निघाले नव्हते. गाव कारभारी सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लक्ष देऊन होते.अशातच पंधरा दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर केला झाला आहे. या पार्श्वभूमीवर गाफील असलेले गाव कारभारी अक्षरश: गांगरून गेले होते. अजून प्रभागाच्या मतदार याद्या हाताशी नाहीत, उमेदवाराचा पत्ता नाही, आघाडी-बिघाडीची बोलणी नाही, कसलीही प्राथमिक स्वरूपाची तयारी नाही. संभाव्य उमेदवाराचे दाखले, सरकारी देणी, विविध संस्थांकडील दाखले नाहीत आणि अशातच सर्व जागांवर योग्य उमेदवार देऊन ते निवडून आणण्याचे दिव्यसंकट समोर उभे राहिले होते.आता निवडणुका नजरेच्या अचूक टप्प्यापर्यंत दूर गेल्यामुळे गावकारभाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ग्रामपंचायतीच्या सत्तेपर्यंत उडी मारण्यासाठी आता गावकारभाऱ्यांना मागे सरण्यासाठी मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे आता निवडणुकीचा फड चांगलाच रंगणार, हे आताच स्पष्ट दिसून येत आहे. (वार्ताहर)पुढाऱ्यांची प्रत्येक कार्यक्रमाला हजेरीकुणाला राम राम, कुणाला सलाम, कुणाला जयभीम, तर कुणाला जय महाराष्ट्र, असे नमस्काराचे वेगवेगळे प्रकार सध्या पाहायला मिळत आहेत. लग्न, सोळावा, मुंज, देवदेव, कोणी आजारी पडले तर त्या ठिकाणी हजेरी, आर्थिक सहकार्याची तयारी, असे वेगवेगळे प्रयोग करून मतदार आपल्या बाजूने कसा वळवता येईल, त्या दृष्टीने पुढाऱ्यांचे प्रयत्न चालू झाले आहेत. कातरखटाव गटात गावपुढारी उदंडकातरखटाव गटात राजकीय विचार केला तर ‘‘लेकुरे उदंड झाली, या नाटकाप्रमाणे ‘ढिगभर नेते आहेत. ऐन उन्हाळ्यात निवडणुका लागल्यामुळे पाणीप्रश्न चांगलाच पेटणार आहे. गावपातळीवर होणाऱ्या निवडणुकामध्ये आमदार जयकुमार गोरे गट, शेखर गोरे गट, आमदार प्रभाकर घार्गे गट, सर्व पक्षांचे उमेदवार निवडणूक लढविणार आहेत हे नक्की.