शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

धोम डावा कालव्यावरील पूल मोजतोय अखेरची घटिका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रहीमतपूर : कोरेगाव तालुक्यातील साप येथील सोनारसिद्ध मंदिर परिसरातील धोम डावा कालव्यावरील वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या पुलाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रहीमतपूर : कोरेगाव तालुक्यातील साप येथील सोनारसिद्ध मंदिर परिसरातील धोम डावा कालव्यावरील वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या पुलाच्या खालील स्लॅबच्या लोखंडी सळया तुटल्या आहेत. त्यामुळे खचला असून, पूल पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेले वर्षभर पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

साप येथील डोंगराकडे जाणाऱ्या सोनारसिद्ध मंदिर परिसरातील पावक्ता नावाच्या शिवारातील धोम डाव्या कालव्यावरील महत्त्वाचा असणारा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. गेले वर्षभर अनेकदा वरूनच हा पूल खचत होता; परंतु या रस्त्यावरून ये-जा करणारे शेतकरी तात्पुरता मुरमाचा भराव टाकून वाहतुकीची गैरसोय दूर करीत होते. पाटबंधारे विभागाकडून गेली दोन वर्षे धोम डाव्या कालव्यावरील इतर ठिकाणचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. कालवा दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत; परंतु वाहतुकीसाठी धोकादायक बनलेल्या या पुलाची पाहणी करून तातडीने नवीन पूल उभारावा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

या धोकादायक पुलावरूनच दररोज उसाने भरलेली वाहने जातात. शेतीमालाची वाहतूक याच रस्त्यावरून नेहमी होते. अचानक पूल कोसळल्यास आर्थिक नुकसानीबरोबरच वाहनधारकांच्या जिवालाही धोका निर्माण होऊ शकतो. धोम डावा कालव्याला पाणी येण्यापूर्वी या पुलाचे काम होणे गरजेचे आहे. पाणी आल्यानंतर पूल कोसळल्यास इतर ठिकाणी कालवा फुटून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

२०१८ मधील मे महिन्यामध्ये साप येथीलच धनगर शेत नावाच्या शिवारातील ओढ्यावरील पूल कालव्याला पाणी आल्यानंतर फुटला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले होते, तसेच मोठे नुकसानही झाले होते. पाटबंधारे विभागाकडून कालव्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळेच वारंवार कालवा फुटीच्या घटना घडत असून, तातडीने धोकादायक पुलाच्या ठिकाणी नवीन व दर्जेदार पुलाची उभारणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

चौकट :

लवकरच काम सुरू...

पाटबंधारे विभागाच्या शाखा क्रमांक तीनचे शाखा अभियंता बी. आर. जाधव यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी धोम डावा कालव्यावरील धोकादायक असलेल्या पुलाच्या उभारणीला येत्या दोन-तीन दिवसांत सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात आले.

फोटो दि.३० रहीमतपूर पूल फोटो...

फोटो ओळ : साप, ता. कोरेगाव येथील धोम डावा कालव्यावरील धोकादायक पुलाच्या स्लॅबच्या लोखंडी सळया तुटल्या आहेत. यामुळे धोका निर्माण झाला आहे. ( छाया : जयदीप जाधव)

---------------------------