दुग्धशर्करा योग, पित्यानंतर पुत्रालाही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा मान; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची एकमताने निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:54 IST2025-06-17T18:53:34+5:302025-06-17T18:54:20+5:30

सातारा : साताऱ्यात तब्बल ३२ वर्षांनंतर होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री ...

Lactose-sugar yoga, after father, son also gets the honor of being the welcome president of the Sahitya Sammelan; Shivendrasinhraje Bhosale was unanimously elected | दुग्धशर्करा योग, पित्यानंतर पुत्रालाही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा मान; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची एकमताने निवड

दुग्धशर्करा योग, पित्यानंतर पुत्रालाही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा मान; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची एकमताने निवड

सातारा : साताऱ्यात तब्बल ३२ वर्षांनंतर होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांच्यानंतर त्यांचे पुत्र शिवेंद्रसिंहराजे यांना स्वागताध्यक्ष पदाचा मान मिळाल्याची ही दुर्मीळ घटना ठरली आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद (शाहूपुरी शाखा), मावळा फाउंडेशन या संस्थांनी मागणी केल्यानुसार, साताऱ्यात ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या दोन्ही संस्थांची संयुक्त बैठक नुकतीच झाली. बैठकीत दोन्ही संस्थांच्या कार्यकारिणी सदस्यांनी शिवेंद्रसिंहराजे यांची एकमताने संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड केली.

हा तर दुग्धशर्करा योग..

साताऱ्यात यापूर्वी ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १९९३ साली झाले होते. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांनी काम पाहिले होते. त्यांच्यानंतर पुत्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना स्वागताध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. साहित्य संमेलनाच्या ९९ वर्षांच्या इतिहासामध्ये वडील आणि मुलगा दोघेही स्वागताध्यक्ष होण्याची ही दुर्मीळ घटना आहे.

Web Title: Lactose-sugar yoga, after father, son also gets the honor of being the welcome president of the Sahitya Sammelan; Shivendrasinhraje Bhosale was unanimously elected