शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
2
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
3
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
4
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
5
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
6
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
7
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
8
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
9
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
10
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
11
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
12
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
13
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
14
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
15
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
16
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
17
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
18
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
19
Monsoon 2026 Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

कूस खुर्दमध्ये दांडपट्ट्याचा शतकी परंपरा !

By admin | Updated: April 28, 2016 00:07 IST

थरार कायम : लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच पारंगत; सर्वच कुटुंबांत खेळले जातात मर्दानी खेळ

सातारा : तब्बल ११० वर्षांची परंपरा जोपासत सातारा तालुक्याच्या पश्चिमेस असणाऱ्या परळी भागातील कूस खुर्द येथील ग्रामस्थांनी दांडपट्टा, अग्निचक्र, तलवारबाजी या मर्दानी खेळाचा थरार जीवंत ठेवला आहे. गावातील जवळपास सर्व कुटुंंबातील वयोवृद्धापासून ते लहान मुले सुद्धा या खेळात पारंगत झाली असून, याचे प्रात्यक्षिक प्रत्येक वर्षी होणाऱ्या यात्रेमध्ये दाखविले जाते.
कूस खुर्द येथील दिवंगत बाळकू देटे हे ११० वर्षांपूर्वी मुंबई येथे नोकरीस होते. यावेळी ते कोकणी लोकांमध्ये राहून दांडपट्टा, अग्निचक्र, तलवार खेळ, लाटने चक्र, भाला, मारकाठी, तिचक्या, दोन-चार-सहा गोळे चक्र आदी मर्दानी खेळ शिकले होते. अधुन-मधून सुट्टीस गावी आल्यावर गावातील मित्रांना ते शिकवत असत. त्यांनी मुंबई सोडल्यावर गावामध्येच शिवशक्ती दांडपट्टा लेझिम मंडळाची स्थापना केली आणि गावाची वेगळीच ओळख निर्माण केली. त्यानंतर त्यांच्या या चौथ्या पिढीने या मर्दानी खेळाची परंपरा जपली आहे. पूर्वीच्या लोकांप्रमाणेच सध्याच्या तरुणपिढीलाही या मर्दानी खेळाची आवड आहे. परळी भागातील अनेक गावच्या यात्रांमध्ये, वरातीमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमात या खेळांची प्रात्यक्षिक होत असतात. विशेष म्हणजे सध्याच्या युगात डॉल्बी व डि. जे. चे वारे आहे. मात्र, या गावामध्ये प्रत्येक वरातीला दांडपट्ट्याचे मर्दानी खेळ सादर करतात. यामध्ये ८ वर्षांपासून ते ८३ वर्षांपर्यंतचे वयोवृद्ध सहभागी होत आहेत.
कूस गावामध्ये येणारे पाहुणेमंडळी मधील हौसी तरुण मुले येथील ग्रामस्थांकडून शिकण्यासाठी आग्रह करतात. तर शेजारच्या गावातीलही मुले शिकण्यासाठी या गावामध्ये जात आहेत. परळी भागामध्ये फक्त याच गावी दांडपट्टा खेळला जातो. गावतील जवळपास सर्वच कुटुंबातील लोक हा मर्दानी खेळ खेळताना दिसतात. अनेक ठिकाणी या मंडळाने बक्षीसही मिळवली आहेत. (प्रतिनिधी)


कूसमध्ये गेल्या ११० वर्षांपासून दांडपट्टा व इतर मर्दानी खेळ खेळले जातात. सध्या डि. जे. व डॉल्बीचे युग चालू आहे. त्यात या गावाने दांडपट्टा हा खेळ जीवंत ठेवला तर सध्या मल्लखांब हा खेळही कालबाह्य होत चालला असल्याने ग्रामस्थ व तरुण मंडळ मुलांसाठी मल्लखांब व मुलींसाठी रोप मल्लखांब चालू करणार आहेत. या मल्लखांब संपूर्ण परळी भागातील मुला-मुलींसाठी शिकविण्यात येणार आहे.


हा मर्दानी खेळ तीन पौंडावर आहे. या खेळाची सुरुवात आमच्या वडिलांनी केली. ते सुटीवर आले की सर्वांना शिकवायचे आणि सध्या त्यांची चौथीपिढी हा खेळ करीत आहे. मी सुद्धा ८३ वर्षांपर्यंत हा खेळ खेळत होतो. गावातील प्रत्येक घरातील व्यक्ती, तरुणवर्ग हा मर्दानी खेळ शिकला आहे. सध्या सर्वत्र डि. जे, डॉल्बीचे युग असतानाही आमच्या दांडपट्टा मंडळाची मागणी तेवढीच आहे.
-सखाराम बाळकू देटे,
ग्रामस्थ, कूस खुर्द