शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

कोयनेचे दरवाजे पुन्हा उघडले, नदीपात्रात विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:33 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढू लागला असून शुक्रवारी सकाळपर्यंत कोयना येथे ७३, महाबळेश्वरला १०५ आणि नवजाला १३८ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे कोयना धरणात आवक वाढली असून पुन्हा दरवाजे दीड फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यातून ९८५७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तर धरणात ९४ टीएमसी साठा झाला होता.

ठळक मुद्दे कोयनेचे दरवाजे पुन्हा उघडले, नदीपात्रात विसर्ग पाऊस वाढला; नवजाला १३८ मिलिमीटरची नोंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढू लागला असून शुक्रवारी सकाळपर्यंत कोयना येथे ७३, महाबळेश्वरला १०५ आणि नवजाला १३८ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे कोयना धरणात आवक वाढली असून पुन्हा दरवाजे दीड फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यातून ९८५७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. तर धरणात ९४ टीएमसी साठा झाला होता.जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात २० दिवसांपूर्वी पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे कोयना, कृष्णा, नीरा, उरमोडी, वेण्णा नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली. तर कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी सारख्या प्रमुख धरणांतील साठाही वेगाने वाढू लागला. त्यातच कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यामुळे शनिवारपासूनच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तर इतर धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता.

परिणामी नद्यांना पूर आला. मात्र, पाच दिवसांपूर्वी पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे धरणातही पाणी कमी येत असल्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला. कोयनेचे दरवाजे १० फुटांपर्यंत उघडण्यात आले होते. तेही बंद करण्यात आले. फक्त पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू होता. मात्र, गुरुवारपासून पावसाचा जोर वाढू लागला. त्यामुळे कोयना धरणातही आवक वाढली.

परिणामी शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास धरणात ९४ टीएमसीवर पाणीसाठा झाला होता. तर आवक वाढल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळपासून धरणाचे दरवाजे दीड फुटापर्यंत वर उचलण्यात आले. त्यातून ९८५७ आणि पायथा वीजगृह २१०० असा ११९५७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.शुक्रवारी सकाळपर्यंत कोयनानगर येथे ७३ तर जूनपासून आतापर्यंत ३७८४ मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला १०५ आणि आतापर्यंत ४२३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला सकाळपर्यंत १३८ आणि आतापर्यंत ४२४९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर सकाळी ११ च्या सुमारास कोयना धरणात ३६६५९ क्यूसेक वेगाने पाणी येत होते.दरम्यान, सातारा शहरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. त्यातच दुपारच्या सुमारास ऊनही पडते. तर शुक्रवारी सकाळी रिमझिम पावसाला सुरूवात झाली. मात्र, त्यानंतर ऊन पडले होते.जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी...जिल्ह्यात पाऊस सुरूच असून शुक्रवारी सकाळी कोयना धरणात ८८.६४ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा झाला होता. तर याची टक्केवारी ८८.५३ होती. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणांतील उपयुक्त पाणीपातळी टीएमसीमध्ये व टक्केवारी कंसात अशी आहे. धोम - १०.९२ (९३.४१), धोम बलकवडी - ३.५९ (९०.५८), कण्हेर - ८.५४ (८९.०७), उरमोडी - ९.१४ (९४.७०), तारळी - ५.४२ (९२.७९), निरा देवघर - १०.६८ (९१.०७), भाटघर - २३.५० (९९.९९) आणि वीर धरण - ९.४१ (१००.०३).

 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसरRainपाऊस