गणेश जयंतीनिमित्त कोविड योद्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:52 IST2021-02-27T04:52:40+5:302021-02-27T04:52:40+5:30

सातारा नवतरुण गणेश क्रीडा मंडळाने सालाबादप्रमाणे गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये कोविड काळात जोखीम घेऊन काम केलेल्या ...

Kovid warriors felicitated on the occasion of Ganesh Jayanti | गणेश जयंतीनिमित्त कोविड योद्यांचा सत्कार

गणेश जयंतीनिमित्त कोविड योद्यांचा सत्कार

सातारा नवतरुण गणेश क्रीडा मंडळाने सालाबादप्रमाणे गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये कोविड काळात जोखीम घेऊन काम केलेल्या १२० कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. पृथ्वीराज रजपूत, डॉ. फय्याज शिकलगार, तबसूम शिकलगार, पोलीस कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी यांचा समावेश होता.

कार्यक्रमासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी दीपाली पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी किशोर धुमाळ, नानासाहेब कदम, महेश शिंदे, अतुल उबाळ या पाहुण्यांच्या हस्ते या कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी नवतरुण गणेश क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते अधिक इंगळे, राहुल वायदंडे, मनिष कांबळे, सूरज शिंदे, संदीप वायदंडे, किरण पाटसुत, नितीन वायदंडे यांनी परिश्रम घेतले.

फोटो आहे - कोरोना योद्धांचा सत्कार करताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी दीपाली पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी किशोर धुमाळ, नगरसेवक बाळासाहेब खंदारे आदी.

Web Title: Kovid warriors felicitated on the occasion of Ganesh Jayanti