Satara: सातबारावर मीच नोंद करून घेतली म्हणत मागितली लाच, फलटणचा कोतवाल लाचलुचपतच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 18:31 IST2025-01-08T18:31:27+5:302025-01-08T18:31:57+5:30

सातारा : सातबारावरची नोंद मीच करून घेतली. याबदल्यात मला ५०० रुपयांची लाच द्या, म्हणणाऱ्या कोतवालाला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून ...

Kotwala of Phaltan arrested in bribery case | Satara: सातबारावर मीच नोंद करून घेतली म्हणत मागितली लाच, फलटणचा कोतवाल लाचलुचपतच्या जाळ्यात

Satara: सातबारावर मीच नोंद करून घेतली म्हणत मागितली लाच, फलटणचा कोतवाल लाचलुचपतच्या जाळ्यात

सातारा : सातबारावरची नोंद मीच करून घेतली. याबदल्यात मला ५०० रुपयांची लाच द्या, म्हणणाऱ्या कोतवालाला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून त्याला अटक केली. ही कारवाई फलटण येथे सोमवारी सायंकाळी करण्यात आली.

दीपक दौलतराव उदंडे (वय ४९, रा. कसबा पेठ, फलटण) असे कारवाई झालेल्या कोतवालाचे नाव आहे. दीपक उदंडे हा सजा फलटण येथे महसूल विभागात कार्यरत आहे. यातील तक्रारदारांनी पत्नीच्या नावे फलटण येथे दीड गुंंठे जागेसह घर खरेदी केले आहे. या घराची सातबारावर मीच नोंद करून घेतली आहे. या कामाचा मोबदला म्हणून कोतवाल दीपक उदंडे याने तक्रारदाराकडे एक हजार लाचेची मागणी केली. तडजोडीअंती पाचशे रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने सातारा येथे येऊन लाचलुचपत विभागात लेखी तक्रार नोंदवली. 

त्यानुसार लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी फलटण येथे सापळा लावला. त्यावेळी कोतवाल दीपक उदंडे याला पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात कोतवाल उदंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, हवालदार गोगावले, गणेश ताटे यांनी केली.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सरकारी कामकाजामध्ये सुलभता आणण्यासाठी सातत्याने सक्रिय आहे. अँटी करप्शन आपल्या दारी हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. तरीसुद्धा नागरिकांकडून शासकीय कामांसाठी पैशांची मागणी वारंवार होत आहे. त्यामुळे नागरिकांनी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Kotwala of Phaltan arrested in bribery case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.