खेड बुद्रूक, सुखेडची वार्षिक यात्रा ‍रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:40 IST2021-02-24T04:40:45+5:302021-02-24T04:40:45+5:30

लोणंद : लोणंद प्रशासनाच्या आदेशानुसार दि. २८ फेब्रुवारी रोजी होणारी खेड बुद्रूक व सुखेड येथील वडजाई देवीची यात्रा ...

Khed Budruk, Sukhed's annual pilgrimage canceled | खेड बुद्रूक, सुखेडची वार्षिक यात्रा ‍रद्द

खेड बुद्रूक, सुखेडची वार्षिक यात्रा ‍रद्द

लोणंद : लोणंद

प्रशासनाच्या आदेशानुसार दि. २८ फेब्रुवारी रोजी होणारी

खेड बुद्रूक व सुखेड येथील वडजाई देवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय नागरिकांकडून घेण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करून आपले गाव व तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे अवाहन खेड बुद्रूकचे सरपंच गणेश धायगुडे पाटील यांनी केले आहे.

लोणंद येथे पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. यावेळी लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक संतोष चौधरी, सुखेड ग्रामपंचायतीचे सरपंच भीमराव धायगुडे-पाटील, पोलीसपाटील रमेश धायगुडे पाटील, सखाराम धायगुडे, मोहन धायगुडे, मोहन जमदाडे ग्रामपंचायत सदस्य नारायण धायगुडे पाटील, सुभाष ठोंबरे, राजेंद्र हाके, अनिल रासकर, सचिन वायदंडे, रामदास हाके, सुनील रासकर, जांलिदर धायगुडे, मुगट चव्हाण सुखेडचे संदीप धायगुडे, अंकुश धायगुडे, संतोष धायगुडे, बाळासाहेब धायगुडे, खेड व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Khed Budruk, Sukhed's annual pilgrimage canceled