शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रॉबेरीच्या वनात फुलले काश्मीरचे ‘केशर’! सह महिन्यांपूर्वीच्या कंदास आली फुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 07:52 IST

Satara News : स्ट्रॉबेरी हब असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात नव्याने प्रायोगिक तत्त्वावर मेटगुताड व क्षेत्र महाबळेश्वर येथे केलेली काश्मिरी केशर लागवड यशस्वी झाली आहे.

पाचगणी (जि. सातारा) - स्ट्रॉबेरी हब असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात नव्याने प्रायोगिक तत्त्वावर मेटगुताड व क्षेत्र महाबळेश्वर येथे केलेली काश्मिरी केशर लागवड यशस्वी झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी लागवड केलेल्या कंदाला आता फुले लगडली असून ती परिपक्व होऊ लागली आहेत.महाबळेश्वर तालुक्यात सप्टेंबरमध्ये मेटगुताड व क्षेत्र महाबळेश्वर येथील शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर केशर लागवड केली होती. महाबळेश्वरचे थंड वातावरण पोषक असल्याने लागवडीचा प्रयोग करण्यात आला होता. लागवड केलेल्या कंदाची योग्य ती निगा राखून जोपासना केल्याने त्या प्रयोगाला यश आले आहे. या लागवड केलेल्या रोपांना आता फुले आली आहेत, तीच फुले परिपक्व होऊन त्यातूनच केशरचे उत्पादन मार्च महिन्यात होणार आहे. यामुळे येथील शेतकऱ्याला नवीन पर्याय उपलब्ध झाला असून, आर्थिक सुबत्ता देणाऱ्या स्ट्रॉबेरीला हे पर्यायी पीक ठरणार आहे.  जम्मू- काश्मीरच्या कोमपूर व किश्तवाड गावात केशरची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, तेथूनच महाबळेश्वरच्या कृषी विभागाने लागवडीकरिता ४५० कंद प्रति ५० रुपये दराने उपलब्ध केले होते. काश्मिरी केशर जगभरात प्रसिद्ध आहे. केशरची बाजार किंमत साडेतीन लाख रुपये किलो आहे. साधारणत: एक ते दीड लाख फुलाच्या परागकणांमधून एक ते दीड किलो केशर निघते. क्षेत्र महाबळेश्वर येथे लागवड केलेल्या काही केशर कंदास फुले आल्यामुळे महाबळेश्वरमधील वातावरणामध्ये केशर लागवड यशस्वी होईल, असा विश्वास आहे.- दीपक बोर्डे, कृषी सहायक, महाबळेश्वर

टॅग्स :agricultureशेती