शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कास धरण : वाढीव पाणीसाठ्याचे नियोजन यंदाही विस्कटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 17:32 IST

Kas Pathar water shortage Satara: सातारा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कास धरणाच्या उंचीवाढीच्या कामाला कोरोनामुळे पुन्हा एकदा ब्रेक लागणार आहे. कोरोनाच्या धास्तीने जवळपास ८० टक्के परप्रांतीय कर्मचारी घराकडे परतले असून, यंदा धरणात वाढीव पाणीसाठा करण्याचे नियोजनही विस्कटले आहे. येत्या आठ दिवसांत धरणाचे काम पूर्णतः थांबणार असून ते पावसाळ्यानंतरच सुरू होईल.

ठळक मुद्देकास धरण : वाढीव पाणीसाठ्याचे नियोजन यंदाही विस्कटले कोरोनामुळे कर्मचारी घराकडे; आणखी आठ दिवस चालणार काम

सातारा : सातारा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कास धरणाच्या उंचीवाढीच्या कामाला कोरोनामुळे पुन्हा एकदा ब्रेक लागणार आहे. कोरोनाच्या धास्तीने जवळपास ८० टक्के परप्रांतीय कर्मचारी घराकडे परतले असून, यंदा धरणात वाढीव पाणीसाठा करण्याचे नियोजनही विस्कटले आहे. येत्या आठ दिवसांत धरणाचे काम पूर्णतः थांबणार असून ते पावसाळ्यानंतरच सुरू होईल.सातारा शहराची हद्दवाढ आणि वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यावर मात करण्यासाठी पालिकेने कास धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले. जलसंपदा विभागाने एक मार्च २०१८ पासून उंचीवाढीच्या कामास प्रारंभ केला. तीन वर्षांच्या कालावधीत धरणाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले.गतवर्षी निधीचा अडसर निर्माण झाल्याने धरणाचे काम उशिरा सुरू झाले. फेब्रुवारी ते मार्च २०२० या कालावधीत जवळपास दीड महिनाच काम सुरू होते. यानंतर कोरोनामुळे या कामाला ब्रेक लागला. जलसंपदा विभाग व लोकप्रतिनिधींनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून धरणाच्या वाढीव कामास निधी मंजूर झाला आणि डिसेंबर २०२० रोजी धरणाचे काम पुन्हा एकदा सुरू झाले. सलग चार महिने काम गतीने सुरू होते. मात्र पुन्हा एकदा या कामाला कोरोनाने ब्रेक दिला आहे.धरणावरील जवळपास ९० टक्के कर्मचारी हे परप्रांतीय आहेत. कोरोनाच्या धास्तीने अनेक जण घराकडे परतू लागले आहेत. तर उर्वरित कर्मचारी देखील घराकडे जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसात धरणाचे काम पूर्णतः बंद होणार आहे. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यातच हे काम पुन्हा सुरू होईल. त्यामुळे कास धरणात यंदा वाढीव पाणीसाठा करण्याचे नियोजन सध्या तरी विस्कळीत झालेले आहे.धरणाचे काम मार्गी लागल्यानंतर आज उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यात तब्बल पाच पटीने वाढ होणार आहे. सातारकरांचा पाणी प्रश्न हा कायमचा मार्गी लागणार आहे. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रकल्पाच्या कालावधीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी सातारकरांना आणखीन प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रकल्प ९५.७२ कोटींवरकेंद्र शासनाच्या सुजल निर्मल योजनेंतर्गत कास धरण्यासाठी ४२ कोटी ८९ लाख इतक्या रकमेला मार्च २०११ मध्ये राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. कामाचा वाढता कालावधी तसेच नवीन रस्ता, जमिनीचे संपादन यासह इतर कामे वाढल्याने हा प्रकल्प तब्बल ११३ कोटींवर पोहोचला होता. परंतु शासनाने धरणातून इतर कामांना वगळले असून धरणाच्या नवीन ९५ कोटींच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. रस्ता व इतर कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावली जाणार आहेत.

टॅग्स :Kas Patharकास पठारwater shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर