शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईला शिक्षणापेक्षा ‘क्रेझ’ प्यारी!

By admin | Updated: August 18, 2015 22:42 IST

खटाव तालुका : महाविद्यालय, बसस्थानकात धूमस्टाईलने एन्ट्री; दिखाव्यासाठी उचापती--महाभारत प्रवासातले...

शेखर जाधव - वडूज--महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवकांमध्ये चंगळवादी संस्कृती रुजत असल्याचे पाहावयास मिळत आहे. शिक्षणाच्या नावाखाली अनेकजण टवाळक्या करत असल्याचे बसस्थानक परिसरात दिसते. कुणी धूमस्टाईलने एन्ट्री करतो, तर कुणी उगीच मुलींच्या समोरून चकरा मारतो. शिक्षणापेक्षा ‘क्रेझ’ प्यारी असणाऱ्या युवकांमध्ये भांडणाचे प्रकारही उद्भवताना दिसत आहेत. दुष्काळी खटाव-माण तालुक्यातून शिक्षणासाठी अनेक युवक-युवमी वडूज शहरात शिक्षणासाठी येत असतात. मात्र योग्य दिशा मिळत नसल्याने कायम निरुत्तर करणारी उत्तरे या भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान करीत असल्याचे चित्र दिसून आहे. दहावीनंतर घ्यायचे म्हणून काहीजण शिक्षण घेत असतात. त्यामुळे महाविद्यालय परिसरात नुसत्या चकरा मारणाऱ्याची संख्या मोठी आहे. कॉलेजमधील किरकोळ कारणावरूनही नेहमीच वादाचे प्रसंग घडत असतात. त्यामुळे पालक व पोलीस यंत्रणेची डोकेदुखी वाढत आहे. तर इतर डेपोतील एसटी बसचालक व वाहक पास घेत नसल्याने होणारे वाद-विवाद यांचे प्रसंगी भांडणात रूपांतर होते. शिक्षणापेक्षा क्रेझला जादा महत्त्व देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मायणी, दहिवडी, खटाव, वडूज व औंध आदी ठिकाणी शिक्षण घेणारे शेतकरी कुटुंबातील अनेक विद्यार्थी असून त्यांना वेळीच मार्गदर्शन मिळाले तर त्यांचे भविष्य घडू शकेल. बसस्थानक परिसरात दादागिरी, मुलींची छेडछाड होत असते. तर अशा किरकोळ कारणांमुळे हुशार मुलेही मागे पडू लागली आहेत. भल्या सकाळी घराबाहेर पडणारी तरुणाई संध्याकाळीच घरी पोहोचते. कॉलेज व क्लासमध्ये आपले जीवन व्यतीत करणारे विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी आपलीही ओळख असावी, असे विद्यार्थ्यांना वाटत असते. सध्याचा काळ फारच भयानक आहे. मात्र, रिस्क घेतली नाहीतर आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही, या कटुसत्यालाच ते प्रसंगी फसत आहेत.तालुक्याच्या ठिकाणावरील दादा... दिदी म्हणेल त्याठिकाणी फिरण्यास तर परिस्थिती नसली तरी त्यांच्यासाठी थोडाफार खर्चसुध्दा करण्याची तयारी त्यांची असते. त्यामुळे दिवसेंदिवस फक्त शिक्षणांपेक्षा इतर विषयात त्यांचा जादा वेळ जास्त जातो. बसमध्ये चढताना होणाऱ्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर प्रसंगी हाणामारीत होण्याचेही प्रकार घडत आहेत. बसमधील जागेवरून वाद परगावहून येणाऱ्या बसमध्ये गर्दी असल्या कारणाने बसण्यासाठी नेहमीच वाद होत असतात. तर खिडकीतून टाकलेले दप्तर इतर ठिकाणी का टाकले, अशा क्षुुल्लक गोष्टीचेही मारहाणीत रूपांतर होत आहे.खुन्नस काढून भांडणेमित्राला बसस्थानकावर सोडण्यासाठी किंवा त्याला भेटण्याचे निमित्त करणारे असंख्य युवक धूमस्टाईलने गाडी चालवित बसस्थानकात एन्ट्री करताना दिसतात. कट का मारला, बघत का गेला अशा किरकोळ कारणावरून खुन्नस काढून भांडणे केली जातात.