शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

‘कलारंग’ला सखींचा टाळ्यांचा पाऊस

By admin | Updated: September 16, 2014 23:51 IST

लावणीच्या तालावर सखींनी मनसोक्त नृत्य

कऱ्हाड : नवीन जुन्या गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरायलावत मॅजीक शोच्या वेगवेगळ्या प्रयोगातून आणि गोंधळी नृत्याच्या माध्यमातून ‘कलारंग’ या कार्यक्रमाने सखींना मंत्रमुग्ध केले. लावणीच्या तालावर सखींनी मनसोक्त नृत्य केले.येथील सोनाई मंगल कार्यालयामध्ये लोकमत सखीमंच आयोजित सह्याद्री इव्हेंटसच्या जादूगार गोरख प्रस्तूत ‘कलारंग’ एक व्हरायटी शो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध ठिकाणी रंगमंच गाजवलेल्या जादू नृत्य, संगीत या कलांनी सजलेल्या विविधरंगी संगीतमय कलाविष्कार या निमित्ताने सखींना पाहायला मिळाला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. सखीमंच कार्यकारिणी सदस्या यांच हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर जादूगार गोरख जाधव यांनी आपली मॅजिक कला दाखवून सर्व सखींना आवक केले. पुस्तकामध्ये आग लावून चित्र तयार करणे. मानेतून तलवार आर-पार करणे, एका पुस्तकातून १५ ते २० बॉक्स निर्माण करणे असे अनेक मॅजिकचे प्रयोग त्यांनी सादर केले.लावणी नृत्याला सखींकडून वन्समोअर मिळत होता तर हिपहॉप गाण्यांना टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता. ‘देवा श्री गणेशा’, ‘या रावजी, बसा भावजी,’ यांसारख्या मराठी गाण्यांबरोबरच ‘प्रितम प्यारे’ यासारख्या हिंदी गाण्यांनाही सखींनी शिट्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.नवीन-जुन्या रिमिंक्स गाण्यांच्या आंताक्षरीलाही सखींनी प्रतिसाद दिला. तर काही सखींनी त्यांच्या सोबत स्टेजवरून जाऊन आपली नृत्य अदा दाखवून दिली. कार्यक्रमाच्या शेवटी ही पोरी साजूक तुपातली या गाण्यामध्ये सर्व सखींनी नृत्य करून आपला आनंद व्यक्त केला.या कार्यक्रमाच्या मध्यभागी रुपसंगम साडीज अ‍ॅण्ड ड्रेस मटेरियल यांचे मालक दुर्गेक्ष पुरोहित आणि देसूदेवी पुरोहित यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. चंदुकाका सराफ यांच्यातर्फे देण्यात आलेल्या सुवर्ण नथीच्या भारती माळी आणि उमा कोळेकर विजेत्या ठरल्या.यावेळी स्वर्ग ज्वेलर्सतर्फे १ ग्रॅम सोन्याच्या बँगल्सच्या जयश्री पोकळ, उज्ज्वला पोरे, रेखा पाटील विजेत्या ठरल्या. यावेळी रुपसंगम साडीज अ‍ॅण्ड ड्रेस मटेरियल यांच्यातर्फे साडी आणि कुर्ती, धनश्री लेडीज वेअर तर्फे कुर्ती आणि मिरॅकल ब्युटी पार्लरतर्फे ब्लीचचा लकी ड्रॉ काढण्यात आला. (प्रतिनिधी)