विसावा नाका येथून जेसीबीची बॅटरी चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 16:38 IST2021-01-02T16:36:21+5:302021-01-02T16:38:29+5:30
Crimenews Satara Police- सातारा येथील विसावा नाका परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये उभा असलेल्या जेसीबीची १० हजारांची बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.

विसावा नाका येथून जेसीबीची बॅटरी चोरीस
ठळक मुद्देविसावा नाका येथून जेसीबीची बॅटरी चोरीससातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल
सातारा: येथील विसावा नाका परिसरातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये उभा असलेल्या जेसीबीची १० हजारांची बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
याप्रकरणी दिग्वीजय प्रदीप पवार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्यात दिली आहे. विसावा नाका येथील शिवांजली अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पवार यांनी त्यांचा जेसीबी पार्क केला होता. दि. २९ डिसेंबर रोजी पहाटे ५ ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने जेसीबीची बॅटरी चोरून नेली.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक मोहिते हे अधिक तपास करत आहेत.