शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
2
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
3
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
4
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
5
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
6
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
7
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
8
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
9
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
10
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
11
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
12
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
13
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
14
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
15
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
16
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
17
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
18
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
19
Monsoon 2026 Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

एकेकाळी होतं दुष्काळी.. आता मात्र मिळाली झळाळी !

By admin | Updated: April 28, 2016 00:04 IST

पळशीला जिल्ह्याच्या राजकारणात स्थान : घार्गेंच्या रूपात नेतृत्व देणाऱ्या गावाला शरद पवारांच्याही लेखी विशेष महत्त्व

शेखर जाधव -- वडूज --छोटे खेडेगाव असल्यामुळे पूर्वी दुर्लक्षित असणारे या पळशी गावाची खरी ओळख आ. प्रभाकर घार्गे यांच्यामुळे महाराष्ट्राला झाली. स्वातंत्र्यापूर्व काळापासून या गावात कोणतेही ठोस काम झालेले नव्हते. त्यामुळे विकास म्हणजे नेमके काय? हे येथील लोकांना ज्ञात नव्हते. मात्र जिल्हा बँकेवर संचालक म्हणून प्रभाकर घार्गे यांची निवड झाल्यानंतर तालुक्यासह पळशी सोसायटी शंभर टक्के नफ्यात आणून त्यांनी त्यांच्यातील असणारे सहकारातील कसब दाखवून दिले.
पळशी (ता. खटाव) या गावची लोकसंख्या १८३४ असून या गावामधील दिवगंत देवबा भाऊ घार्गे हे प्राथमिक शिक्षक होते. त्यांना तीन मुले आणि तीन मुली होत. त्यामध्ये आमदार प्रभाकर घार्गे, माजी सरपंच प्रकाश घार्गे तर तिसरे सुधाकर घार्गे असा परिवार आहे. दिवगंत माजी आ. केशवराव पाटील हे आ. प्रभाकर घार्गे यांचे सासरे होत. त्यामुळे त्यांना राजकीय वारसा लाभला असला तरी राजकारण करताना या दुष्काळी तालुक्यात ठोस विकासकामे होणे आवश्यक असल्याचे भान ठेवत आजअखेर त्यांची वाटचाल सुरू आहे.
तदनंतर सांगली-सातारा विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर पळशी गावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करून गावचा कायापालट केला. राज्यातील आदर्श गावामध्ये पळशीचेही नाव घेतले जाईल असे काम त्यांनी या ठिकाणी केले आहे.
जल्हा बँकेचे संचालक ते विधानपरिषदेचे आमदारपद या काळात गावच्या सर्वांगीण विकासासाठी भरपूर निधी आणि योजना राबवून राजकारणातून समाजकारण करता येते, ते सिध्द करून दाखविले. खा. शरद पवार यांचा दांडगा विश्वास आ. घार्गे यांच्यावर असल्याने खटाव-माण तालुक्यातील कोणताही निर्णय घ्यावयाचा असल्यास आ. घार्गे त्यांना विचारात घेतले जाते.
विधानपरिषदेत दुष्काळी भागासाठी वारंवार आवाज उठवून विविध शासन पातळीवरील योजना कायान्वित केल्या आहेत. त्यामध्ये पळशी गावासाठी लहान-मोठ्या बंधाऱ्यांची तरतूद करून गावकऱ्यांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यासाठी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, खा. विजयसिंह मोहिते-पाटील आणि स्वत:च्या फंडासह इतर सहयोगी आमदार, खासदार यांच्या निधीतून आणि बजेट मध्ये खास तरतूद करून पळशी गावात भरीव विकासाचे काम पाहिला मिळते.


काय नाही ते बोला!
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा बँकेचे संचालक, आमदार प्रभाकर घार्गे यांनी पळशी गावात अनेक विकासकामे केली. यामध्ये ग्राम सचिवालयाची सुसज्ज इमारत संगणीकृत सोसायटीची अद्ययावत इमारत, व्यायाम शाळा, शाळा संरक्षक भिंत सर्व समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी, अंगणवाडी इमारत, बहुउद्देशीय सभागृह, बौध्द समाज मंदिर, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मागासवर्गीय रस्ता, वाचनालय इमारत, गावतील अंतर्गत रस्ते, काँक्रिटीकरणातील बंदिस्त गटारे,गावातील प्रत्येक मंदिर परिसरात सभामंडप, स्ट्रीट लाईट, वाड्या-वस्त्यांवर दिवाबत्तीसह रस्ते, पिकअप शेड, शैक्षणिक संस्थेची सुसज्ज इमारत, पळशी गावाचे दळणवळण सुधारण्यासाठी मोठ्या शहराला जोडणारे रस्ते डांबरीकरण, सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देऊन सोसायटी शंभर टक्के नफ्यात, महिला बचतगट सक्षम होण्यासाठी पाठपुरावा केला.