सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या निवडीत शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आणि भाजप सदस्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर महायुतीतच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली असून विरोधकांवर टीका केली.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये महायुतीमध्ये अंतर्गत वाद दिसत आहे. काल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला करत भाजपाने आपल्या पक्षाचा जिल्हा अध्यक्ष बसवला. यावरुन आता महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी भाजपवर केलेल्या टीकेला उत्तर देताना महेश शिंदे म्हणाले की, "कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजप यांनी युती करूनच ही निवडणूक लढवली होती. जिल्ह्यात जिथे शक्य आहे तिथे युती करण्याचा निर्णय निवडणुकीपूर्वीच घेण्यात आला होता. त्यानुसार आम्ही कोरेगाव मतदारसंघात एकत्र लढलो आणि म्हणूनच जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत आम्ही भाजपसोबत राहिलो."
शशिकांत शिंदेंवर 'मिठाचा खडा' म्हणत निशाणा
यावेळी आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. जिल्हा परिषद निवडीत जे काही राडे आणि नाट्यमय घडामोडी घडल्या, त्याला शशिकांत शिंदेच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. "शशिकांत शिंदे हे या प्रक्रियेतील 'मिठाचा खडा' ठरले आहेत, त्यांच्याच वर्तणुकीमुळे कालच्या सर्व घडामोडींना गालबोट लागले," असा टोला महेश शिंदे यांनी लगावला.
साताऱ्यात नव्या समीकरणाची चर्चा
प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने साताऱ्यात भाजप आणि महेश शिंदे गटाची ताकद वाढल्याचे मानले जात आहे. मात्र, यामुळे महायुतीतील इतर घटक पक्षांमध्ये, शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील गटात नाराजी पसरल्याचे चित्र आहे. या निवडीमुळे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात नवी समीकरणे पाहायला मिळू शकतात.
Web Summary : Satara Zilla Parishad election sparks Mahayuti conflict. Mahesh Shinde defends BJP alliance, criticizing Shambhuraj Desai & Makrand Patil. He blames Shashikant Shinde for disruptions, hinting at new political equations.
Web Summary : सतारा जिला परिषद चुनाव से महायुति में विवाद। महेश शिंदे ने भाजपा गठबंधन का बचाव किया, शंभूराज देसाई और मकरंद पाटिल की आलोचना की। उन्होंने अशांति के लिए शशिकांत शिंदे को दोषी ठहराया, नए राजनीतिक समीकरणों का संकेत दिया।