Satara ZP Election 2026: पालकमंत्री कोणीही असू देत काही फरक पडत नाही, जयकुमार गोरे यांनी भरसभेतून दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 19:39 IST2026-02-03T19:39:13+5:302026-02-03T19:39:44+5:30

पाटण विधानसभा मतदारसंघातील सत्यजित पाटणकर हेच या ठिकाणचे पालकमंत्री

It doesn't matter who the Guardian Minister is says Jayakumar Gore | Satara ZP Election 2026: पालकमंत्री कोणीही असू देत काही फरक पडत नाही, जयकुमार गोरे यांनी भरसभेतून दिला इशारा

Satara ZP Election 2026: पालकमंत्री कोणीही असू देत काही फरक पडत नाही, जयकुमार गोरे यांनी भरसभेतून दिला इशारा

तांबवे : ‘सातारा जिल्ह्यात लोकांना कोणी वाली नाही, असं वाटत असेल तर भाजप त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री कोणीही असू दे फरक पडत नाही,’ असा इशारा तांबवे येथील सभेत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.

तांबवे, ता. कराड येथील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, सत्यजित पाटणकर, माजी आमदार आनंदराव पाटील, तांबवे जिल्हा परिषद गटातील उमेदवार धनंजय ताटे, पंचायत समितीचे तानाजी देवकर, स्नेहलता पाटील यांची उपस्थिती होती.

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ‘पाटण विधानसभा मतदारसंघातील सत्यजित पाटणकर हेच या ठिकाणचे पालकमंत्री आहेत. या निवडणुकीत जनता विरोधकांना धडा शिकवेल,’ असा विश्वास व्यक्त केला. पाटण मतदारसंघात छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांना आणून दम दिला असल्याचा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जयकुमार गोरे यांनी केला.

आमदार अतुल भोसले म्हणाले, ‘सध्या सर्वत्र भाजपचे वारे घोंगावत आहे. यामुळे विरोधक काहीही बोलत आहेत.’ यावेळी विजय चव्हाण, आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title : सतारा जिला परिषद चुनाव: जयकुमार गोरे ने पालक मंत्री को नकारा, भाजपा समर्थन का आश्वासन दिया।

Web Summary : मंत्री जयकुमार गोरे ने सतारा जिला परिषद चुनाव के लिए तांबवे रैली में पालक मंत्री के प्रभाव को नकारते हुए भाजपा के समर्थन की घोषणा की। उन्होंने पालक मंत्री शंभूराज देसाई पर धमकाने का आरोप लगाया। विधायक अतुल भोसले ने भाजपा के बढ़ते प्रभाव पर प्रकाश डाला।

Web Title : Satara ZP Election: Gore dismisses guardian minister's influence, assures BJP support.

Web Summary : Minister Jaykumar Gore declared BJP's support, irrespective of the guardian minister, at Tambave rally for Satara ZP election. He accused guardian minister Shambhuraj Desai of intimidation. MLA Atul Bhosale highlighted BJP's growing influence.