कऱ्हाडला महात्मा बसवेश्वर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:42 IST2021-08-24T04:42:27+5:302021-08-24T04:42:27+5:30

कऱ्हाड : येथील बसवेश्वर फाऊंडेशनच्यावतीने कमळेश्वर मंदिराच्या शेजारील बसवेश्वर उद्यानामध्ये सोमवारी महात्मा बसवेश्वर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ...

Installation of a statue of Mahatma Basaveshwar at Karhad | कऱ्हाडला महात्मा बसवेश्वर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

कऱ्हाडला महात्मा बसवेश्वर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

कऱ्हाड : येथील बसवेश्वर फाऊंडेशनच्यावतीने कमळेश्वर मंदिराच्या शेजारील बसवेश्वर उद्यानामध्ये सोमवारी महात्मा बसवेश्वर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बंडा गुजर व सुनीता गुजर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

कऱ्हाड येथे लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे. महात्मा बसवेश्वर हे त्यांचे श्रध्दास्थान आहेत. त्यामुळे समाजाच्या कार्यकर्त्यांना कऱ्हाडात बसवेश्वरांची मूर्ती किंवा पुतळा असावा, असे मनोमन वाटत होते. ती अपेक्षा ओळखून बंडा गुजर यांनी पुढाकार घेत बसवेश्वर उद्यानात सोमवारी (दि. २३) बसवेश्वर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

या कार्यक्रमाला शिवानंद डुबल, धनंजय सिंहासने, दत्तात्रय तारळेकर, संजीव सराटे, संजय शेटे, संभाजी सल्ले, संजय खुंटाळे आदी उपस्थित होते. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

फोटो २३ बसवेश्वर

कऱ्हाड येथे महात्मा बसवेश्वर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बंडा गुजर, सुनीता गुजर यांच्या हस्ते झाली.

Web Title: Installation of a statue of Mahatma Basaveshwar at Karhad