शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टकार्डवर ऊस नोंदीची माहिती

By admin | Updated: November 8, 2015 23:41 IST

किसन वीर कारखाना : सभासदांच्या हितासाठी आधुनिकीकरणाचे आणखी एक पाऊल

भुर्इंज : ‘किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने सभासदांना गतिमान सेवा-सुविधा देताना आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कारखाना कार्यस्थळावरील साखर भवनात एटीएम मशीनसारखेच किआॅस मशीन कार्यान्वित करून हे मशीन सभासदांसाठी खुले केले आहे. कारखान्याच्या सभासदांना त्यांना दिलेल्या स्मार्टकार्डच्या आधारे सर्व माहिती एका बटणावर उपलब्ध होणार आहे,’ अशी माहिती अध्यक्ष मदन भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पत्रकात म्हटले आहे की, संचालक मंडळाने सभासदहित नजरेसमोर ठेवून गेल्या बारा वर्षांत कारखान्याचा कारभार करताना आधुनिक व नवतंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्याअंतर्गत कारखान्याच्या सर्व विभागाचे संगणकीकरण, अ‍ॅण्ड्रॉइड मोबाईलद्वारे ऊस नोंदणी, एसएमएसद्वारे नियोजित कार्यक्रमांची माहिती, अद्ययावत साखर भवन, सर्व सभासदांना स्मार्टकार्ड आदी आधुनिक सेवा-सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. आता कारखान्याने दिलेल्या स्मार्टकार्डचा वापर बँकेच्या एटीएम मशीनसारख्याच किआॅस मशीनवर करून कारखान्याच्या सभासदांना त्यांच्या उसाची नोंद, टनेज, ऊसबिल, शिल्लक साखर, शेअर्स व ऊस विकासाच्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे. शिवाय या मशीनवरच सभासदांना आपल्या स्कार्टकार्डवरील माहिती अद्ययावत करून घेणे शक्य होणार आहे. तसेच हवी असलेली माहिती प्रिंट करून घेण्याची सुविधाही या मशीनमध्ये आहे.कारखान्याच्या सर्व सभासद बांधवांनी स्मार्टकार्डचा वापर कार्यस्थळावरील किआॅस मशीनवर करून त्याच्या आधारे आपल्याला हवी असलेली माहिती घ्यावी, स्मार्टकार्डवरील आपली माहिती अद्ययावत करावी, असे आवाहनही माजी आमदार मदन भोसले यांनी केली आहे.अनेक साखर कारखान्यांतील सभासदांना आवश्यक ती माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेकवेळा कारखान्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. किसन वीर साखर कारखान्याने सभासदांच्या हितासाठी आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत. स्मार्टकार्ड आणल्यामुळे एका क्लिकवर कारखान्याची माहिती व ऊस नोंदी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचणार आहे. अशा भावना किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या अनेक सभासदांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत. (प्रतिनिधी)सारं काही एका क्लिकवरबळीराजाचा विकास करायचा असेल तर त्याला बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. हे ओळखून किसन वीर साखर कारखान्याने आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कारखान्याच्या सभासदांना स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे. या कार्डमुळे सर्व माहिती एका बटनावर मिळणार असल्याने वेळ आणि पैसा वाचणार आहे.