शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

ईदसाठी सुकामेव्याला वाढती मागणी

By admin | Updated: July 15, 2015 21:15 IST

खरेदीवर परिणाम : नमाज पठणात पावसासाठी प्रार्थना

सातारा : येत्या शनिवारी साजरी होणारी रमजान ईदसाठी बाजारात मागील आठवड्यापासून सुखामेवासाठी मागणी वाढली आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा सुखामेव्यात कोणतीच वाढ झाली नसली तरी लांबणीवर पडलेल्या पावसामुळे मागील वर्षापेक्षा १० ते २० टक्के खरेदीवर परिणाम झाला आहे.महिनाभराच्या उपवासाची सांगता ‘रमजान ईद’ने होते. रमजान ईद ही ‘शिरखुमा’ या मेनूशिवाय साजरी होवू शकत नाही. त्यामुळे ईदला सुखामेव्याची मोठी उलाढाल होत असते. यावर्षी मात्र, या चित्रात चांगलाच फरक असल्याचे जाणवत आहे.काजू, बदाम, चारोळे, मनुका, पिस्ता, खारीक, खजूर, आक्रोड, खसखस, शेवई आदी वस्तूने दुकाने सजली आहेत. साधारणत: २०० ते ३०० रुपये प्रति २५० ग्रॅम वजनी किंमत आहे. गतवर्षीच्या तुलनेत फक्त पिस्त्याचे दर वाढले आहेत. तसेच रमजान महिन्यात खास करुन उपवासासाठी ओली खजूरालाही मोठी मागणी असून बाजारात विदेशातून मोठ्या प्रमाणात विविध जातीचे खजूर दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)पावसासाठी प्रार्थनारमजान महिना हा मुस्लिम समाजात पवित्र मानला जातो. यंदाची ईद ही पावसाळ्यात आली आहे. पावसाळा सुरु होऊन देखील पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे नमाज पठणात पावसासाठी प्रार्थना केली जात आहे. वेळेत पाऊस पडला तर सर्वत्र ईदचा आनंद द्विगुणीत होईल. - मौलाना जमीर, सातारा.विक्रीत घटजागतिक मंदी व लांबणीवर पडलेल्या पावसामुळे यंदा बाजारात गतीवर्षीपेक्षा १० ते २० टक्के विक्री घटली आहे. ग्राहकांची संख्या तीच असली तरी ग्राहकांनी यंदा सुका मेवा घेण्यात काटकसर दाखवली आहे. त्यामुळे विक्रीत घट दिसून येत आहे.- रेहान कच्छी, मसाले व्यावसायिक