शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

असुविधांचा कल्ला, अर्धा कोटीचा गल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 23:48 IST

प्रगती जाधव-पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : टोलनाका कार्यक्षेत्रातील २० किमी अंतरावर महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, आपत्कालीन ...

प्रगती जाधव-पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : टोलनाका कार्यक्षेत्रातील २० किमी अंतरावर महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, आपत्कालीन सोयीसाठी रुग्णवाहिका असणं अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र यातील कोणतीही सुविधा खेडशिवापूर- आनेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर उपलब्ध नाही. प्रचंड असुविधा असतानाही या टोलनाक्यांवरून विक एंडला चक्क ५० लाखांहून अधिक टोल संकलन होत असल्याची माहिती आहे.पुण्याहून सातारा, कोल्हापूर आणि सांगली या तिन्ही जिल्ह्यांकडे जाण्यासाठी खेडशिवापूर, आनेवाडी आणि तासवडे असे तीन टोलनाके येतात. तर कोल्हापूरकडे जाताना किणी टोलनाका लागतो. हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे अनेक अवजड वाहने, मालवाहतूक करणारे ट्रक, पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास करणारे, व्यावसायिक दौरे करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या महामार्गावर कायम वर्दळ असते.महामार्गावर कोणताही अपघात झाला तर टोलनाका परिसरात त्याची माहिती देणं अपेक्षित असतं. त्यानंतर तातडीने अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचार देण्याची व्यवस्था करून मग रुग्णांना पुढे नेणे अपेक्षित आहे. असे असताना टोलनाका परिसरात रुग्णवाहिका किंवा वाहिकेचा चालक यापैकी कोणीतरी नेहमीच गायब असतं. त्यामुळे गरजेच्यावेळी सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत.पुण्याहून खेडशिवापूर, आनेवाडी आणि तासवडे या टोलनाक्यांवर दिवसाला सरासरी ५० लाखांचा टोल वसूल होतो. सण, आठवड्याची अखेर आणि सलग येणाºया सुट्यांमध्ये हा आकडा दिवसाला कोटींच्या घरात जातो. दिवसाला कोट्यवधींचा गल्ला मिळूनही सोयीसुविधांचा कल्ला दिसतो.महामार्गावरील पादचारी मार्ग थोडाजरी पाऊस पडला तरी पाण्यात जातात. त्यामुळे महामार्गानजीक वसलेल्या गावकऱ्यांना पाण्यातून मार्ग काढावा लागतो, अथवा धोका पत्करून महामार्ग ओलांडावा लागतो. रस्ता, भुयारी मार्ग, पूल, सेवा रस्ता ही सर्वच कामे जवळपास दीड वर्षापासून ठप्प आहेत.वाहनधारकांना कोणत्याही सुविधा उपलब्ध होत नाहीत. मात्र, त्यांच्यासाठी टोलवसुली ही बंधनकारकच आहे. अपुºया कामांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. एखादा अपघात झाल्यास महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदाराने अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी तातडीने क्रेन उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. मात्र, प्रत्येकवेळी खासगी क्रेनच मागविली जाते. या क्रेनचे भाडे संबंधित वाहनचालकांकडूनच वसूल केले जाते. अशाप्रकारे वाहनधारकांना भुर्दंडही सहन करावा लागत आहे. सुविधांची वानवा असूनही जीव मुठीत धरुन या मार्गावरुन प्रवास करावा लागतो. तरीही टोलची वसुली मात्र नियमितपणे सुरु आहे.वाहकाशिवाय उभी असते रुग्णवाहिकाटोलनाका परिसरात अपघात झाल्यानंतर तेथे अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णवाहिका आणि प्रथमोपचार किट असणं बंधनकारक आहे. मात्र, कित्येकदा टोलनाक्यावर वाहकाशिवाय रुग्णवाहिका उभी असते, काहीवेळा रुग्णवाहिकाही गायब असते. त्यामुळे अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळत नाहीत.