शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
5
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
6
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
7
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
8
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
9
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
10
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
11
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
12
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
13
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
14
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
15
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
16
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
17
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
18
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
19
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
20
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

चालकाच्या मोबाईलवर बोलण्याने घेतला बळी, कऱ्हाडजवळील नांदलापूरमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 4:19 PM

रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वृद्धाला क्रेनने चिरडले. नांदलापूर, ता. कऱ्हाड येथे बसथांब्याजवळ शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. क्रेनचालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे हा अपघात घडला अशी अपघातस्थळी चर्चा होती. मारूती आण्णा सावंत (वय ६५, रा. बेघर वसाहत, जखिणवाडी, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.

ठळक मुद्देएसटीची वाट पाहणाऱ्या वृद्धाला क्रेनने चिरडलेमोबाईल कानाला.... हातात स्टेअरींगनियमांची पायमल्ली करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करणे गरजेचेमहामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

मलकापूर  ,दि. ११ :  रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वृद्धाला क्रेनने चिरडले. नांदलापूर, ता. कऱ्हाड येथे बसथांब्याजवळ शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. क्रेनचालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे हा अपघात घडला अशी अपघातस्थळी चर्चा होती.मारूती आण्णा सावंत (वय ६५, रा. बेघर वसाहत, जखिणवाडी, ता. कऱ्हाड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाडहून एक क्रेन (एमएच ०५ झेड ०५२४) शनिवारी दुपारी काले गावाकडे निघाली होती. त्यावेळी उपमार्गावर नांदलापूर येथील बसथांब्याजवळ मारूती सावंत एसटीची वाट पाहत थांबले होते.

क्रेनने काले गावाकडे निघाली असताना त्याचा चालक मोबाईलवर बोलत होता. त्यामुळे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या मारूती सावंत यांच्याकडे चालकाचे लक्षच गेले नाही.

परिणामी, सावंत क्रेनखाली सापडले. त्यामध्ये ते जागीच ठार झाले.  अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

महामार्ग पोलीस व कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानीही त्याठिकाणी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात पाठवून देण्यात आला.मोबाईल कानाला.... हातात स्टेअरींगसध्या मोबाईलवर बोलत कोणतेही वाहन चालवण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. मोबाईलवर बोलत गाडी चालवणारांकडूनच बरेच अपघात घडत आहेत. वाहन चालवण्यासाठी असलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात