Satara: यशवंत बँक अपहारप्रकरणी एकास अटक, २९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी; ईडी'ने पाच ठिकाणी टाकले होते छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:29 IST2025-12-25T13:26:37+5:302025-12-25T13:29:59+5:30

या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून मंगळवार, दि. २३ रोजी फलटण आणि कराड येथे पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले

In connection with the 112 crore financial embezzlement case at the Yashwant Cooperative Bank in Phaltan, Satara district, one person has been arrested and remanded to police custody until December 29 | Satara: यशवंत बँक अपहारप्रकरणी एकास अटक, २९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी; ईडी'ने पाच ठिकाणी टाकले होते छापे

Satara: यशवंत बँक अपहारप्रकरणी एकास अटक, २९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी; ईडी'ने पाच ठिकाणी टाकले होते छापे

सातारा/कराड : फलटण (जि.सातारा) येथील यशवंत सहकारी बँकेत झालेल्या तब्बल ११२ कोटींच्या आर्थिक अपहारप्रकरणी तपासाचा फास अधिक आवळत सातारा आर्थिक गुन्हे शाखेने शेखर चरेगावकर यांचा दत्तक भाऊ शौनक उर्फ विठ्ठल गोविंद कुलकर्णी (रा.पुणे) याला अटक केली आहे. त्याला कराड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सोमवार, दि. २९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून मंगळवार, दि. २३ रोजी पहाटेपासून फलटण आणि कराड येथे पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापासत्रात सुमारे १६ तासांहून अधिक काळ कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली. मध्यरात्रीनंतर उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांनी या अपहार प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असून, पाच जणांना नोटिसा बजावण्यात आल्याचे समजते.

याबाबत १२ ऑक्टोबर रोजी कराड शहर पोलिस ठाण्यात यशवंत बँकेतील ११२ कोटींच्या अपहारप्रकरणी शेखर चरेगावकर यांच्यासह सुमारे ५० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात बँकेच्या ठेवीदारांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत, संपूर्ण अपहार प्रकरणाची ईडीमार्फत सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानंतरच ईडीने फलटण, कराड आणि परिसरात छापासत्र राबवून बँकेच्या शाखांमध्ये जाऊन चौकशी करत आर्थिक व्यवहार तपासले आहेत.

Web Title : सतारा: यशवंत बैंक घोटाले में एक गिरफ्तार, पुलिस हिरासत में भेजा गया।

Web Summary : 112 करोड़ के यशवंत बैंक घोटाले में एक गिरफ्तार; 29 दिसंबर तक पुलिस हिरासत में। ईडी ने पांच स्थानों पर छापे मारे, दस्तावेज जब्त किए और जमाकर्ताओं की अपील के बाद धोखाधड़ी के संबंध में नोटिस जारी किए।

Web Title : Satara: One arrested in Yashwant Bank scam, remanded to police custody.

Web Summary : One arrested in 112 crore Yashwant Bank scam; remanded to police custody until December 29. ED raided five locations, seizing documents and issuing notices in connection with the fraud following depositors' appeal.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.