शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

आनेवाडीच्या टोलनाक्यावर फास्टॅगची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:12 IST

पाचवड : आशियाई महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर फास्टॅगची अंमलबजावणी सुरू झाली असून, वाहनचालकांकडून प्रतिसाद मिळत आहे. यामुळे टोल देण्यासाठी लागणाऱ्या ...

पाचवड : आशियाई महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर फास्टॅगची अंमलबजावणी सुरू झाली असून, वाहनचालकांकडून प्रतिसाद मिळत आहे. यामुळे टोल देण्यासाठी लागणाऱ्या वेळेमध्ये बचत होणार असून, वाहनकोंडीलाही आळा बसण्यास मदत होईल. तर प्रत्येक शनिवार व रविवारी रांगा लागत होत्या. आता मात्र फास्टॅगने कोंडी संपुष्टात आल्याने चालक व प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.टोलनाक्यांवर टोल स्वीकारताना लागणाºया लांबच लांब रांगांमुळे वाहनचालक व प्रवाशांना नाहक त्रास होत होता. यावर तोडगा काढताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने फास्टॅग ही इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन प्रणाली सुरू केलेली आहे. अनेक टोलनाक्यांवर ही प्रणाली वापरण्यास सुरुवात झाली असून, त्याच अनुषंगाने आनेवाडी टोलप्रशासनाने देखील ही सुविधा देण्यास सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक मुख्य शहरांना जोडणाºया आशियाई महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर शनिवार, रविवार त्याचबरोबर सलग सुट्यांच्या कालावधीमध्ये वाहनांच्या रांगा लागत होत्या. मात्र, फास्टॅग प्रणालीमुळे आता अशा रांगा टोलनाक्यावर पुन्हा पाहायला मिळणार नाहीत. फास्टॅग प्रणालीच्या अंमलबजावणीपासून हा बदल आता दिसू लागल्याची माहिती टोलव्यवस्थापनाकडून देण्यात आली.फास्टॅग कोठे मिळेल?वाहनचालक, प्रवासी व नागरिकांना राष्ट्रीयीकृत बँका, सर्व टोलनाके तसेच आॅनलाईन व्यवसाय करणाºया कंपन्यांकडून फास्टॅग मिळू शकतो. आपल्या वाहनाच्या पुढील बाजूच्या काचेवर तो व्यवस्थित ट्रॅक होईल, अशारितीने तो चिकटवायचा आहे. फास्टॅग काढण्यासाठी वाहनाचे आरसी बुक व कोणतेही आयडेंटी असणारे कागदगपत्र आवश्यक आहे.वेगळी लेन...दुचाकी वाहने वगळून इतर सर्व वाहनांना फास्टॅग वापरणे आता बध्ांनकारक आहे. फास्टॅग वापरणाºया वाहनांना टोलनाक्यांवर वेगळी लेन करण्यात येणार आहे. सध्यातरी आनेवाडी टोलनाक्यावर फास्टॅग वाहनांसाठी वेगळी लेन नसलीतरी लवकरच ती तयार करण्यात येणार असल्याची माहिती टोल प्रशासनाकडून देण्यात आली.स्थानिकांकडून वसुली नाहीफास्टॅगबाबत अनेक स्थानिक वाहनचालकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मात्र, फास्टॅग प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे कोणत्याही स्थानिक वाहनचालकाकंडून टोलवसूल करण्यात येणार नाही. त्यामुळे स्थानिकांनी याबाबत संभ्रमित होऊ नये, असे आवाहनही आनेवाडी टोल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.