शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपतींबद्दल बोलाल तर जीभ हासडू

By admin | Updated: April 5, 2015 00:01 IST

उदयनराजे : जरंडेश्वर कारखान्यात घुसणार; रामराजेंचे सारे उद्योग बाहेर काढू

सातारा/फलटण : ‘छत्रपतींच्या घराण्याबद्दल बोलाल तर जीभ हासडून हातात देईन. रामराजेंचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते काहीही बोलत आहेत. पालकमंत्री शिवतारेंना ते अस्वल म्हणण्याइतपत त्यांची मजल गेली आहे. अस्वल गुदगुल्या करून जसे सगळे बाहेर काढते, तसे यांचे उद्योग आता बाहेर निघणार आहेत, असा इशारा रामराजेंना देत असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘कोरेगावच्या गुरू कमोडिटीज कारखान्यात घुसून कारखाना जरंडेश्वरच्या ताब्यात देण्याबरोबरच गुरूचा गुरू कोण? हे दाखवून देणार आहे,’ असेही सांगितले. सातारा व फलटण येथे पत्रकारांशी ते बोलत होते. फलटण येथे त्यांच्यासोबत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, कृष्णा खोरेचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, महेंद्र बेडके, अ‍ॅड. नरसिंह निकम, धनंजय महामुलकर उपस्थित होते. उदयनराजे म्हणाले, ‘मी सातारा जिल्ह्याचा खासदार व छत्रपतींचा वंशज असल्याने मी कोठेही जाऊ शकतो, बोलू शकतो. फलटण तालुक्यावरील रामराजे व त्यांच्या भावांच्या दहशतीला जनता कंटाळली आहे. पाणीप्रश्नावर पंधरा वर्षे झुलवत ठेवणाऱ्यांनी दोन पिढ्यांचे नुकसान केले आहे. श्रीराम कारखाना त्यांच्यामुळेच अडचणीत आला आहे. राजे पॅनेलच्या हाती सभासदांनी सत्ता देऊ नये. रामराजेंना स्वत:च्या नावात ‘राम’ आहे, असे वाटत असेल, तर त्यांनी श्रीराम कारखाना लोकांच्या ताब्यात सुपूर्द करून बाजूला व्हावे.’