रहिमतपूर (जि. सातारा) : पुण्यातील पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन खरेदी गैरव्यवहार या घटनेची मला पूर्वमाहिती नव्हती. माझ्यावर विनाकारण आरोप केले जात आहेत. ‘जनतेची कामे करणाऱ्यांवरच आरोप होतात. एक रुपया कुणाला दिला नाही, घेतला नाही. मग व्यवहार झाला कसा? याप्रकरणी चौकशीसाठी कमिटी बसली आहे, सर्व माहिती लवकरच समोर येईल,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार व्यक्त केला.रहिमतपूर येथे रविवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शहाजी क्षीरसागर आणि संभाजीराव गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, अनिल देसाई यांची उपस्थिती होती.अजित पवार म्हणाले, ‘सुनील माने यांचा पक्षप्रवेश नाही, ती घरवापसी आहे. जनतेची कामे करण्यासाठी सत्ता आवश्यक असते. विरोधी पक्षात असताना आंदोलने आणि उपोषणे करता येतात; पण जनतेची कामे सत्तेतूनच होतात. आम्ही भाजपसोबत गेलो आहोत; पण विचारधारा सोडलेली नाही.
Web Summary : Ajit Pawar denies involvement in land deal allegations, citing no exchange of money. He highlights the importance of power for public service while defending his alliance with BJP. He also welcomed leaders back to his party.
Web Summary : अजित पवार ने जमीन सौदे के आरोपों का खंडन किया, कहा कोई लेन-देन नहीं हुआ। उन्होंने जनसेवा के लिए सत्ता के महत्व पर प्रकाश डाला और बीजेपी के साथ अपने गठबंधन का बचाव किया। उन्होंने नेताओं का अपनी पार्टी में स्वागत किया।