शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे ड्रोनने हल्ले; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
3
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
4
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
5
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
7
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
8
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
9
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
10
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
11
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
13
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
14
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
15
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
16
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
17
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
18
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
19
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
20
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

'मशागत करुन मी पीकही चांगलं आणलंय', शिवेंद्रराजेंच्या भाजपा प्रवेशावर पवार म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 16:07 IST

दीपक पवार : शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशावर सूचक वक्तव्य; भावी आमदार मीच असं स्पष्टीकरणही

सातारा : ‘भाजपमध्ये राहून चांगली मशागत करुन मी पीकही चांगलं आणलंय. आता पक्षात येणाऱ्यांना हे पीक मी काढू देईन काय? असे सूचक वक्तव्य पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप पक्षप्रवेशावर केले. तसेच सातारा मतदारसंघातून भावी आमदार मीच असणार आहे. त्यासाठीच पक्षाने मला पद देऊन ताकद दिलीय, असेही त्यांनी सांगितले.  

येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी बुवासाहेब पिसाळ, सुधीर पवार, गीता लोखंडे, सागर पावशे, दत्तात्रय साळुंखे, दादा रसाळ आदी उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दीपक पवार यांनी प्रथमच साताºयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांनाही उत्तर दिले. पवार म्हणाले, ‘भाजपमध्ये चांगले काम करणाऱ्यांना ताकद देण्याचे काम होते. तेच काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. सातारा विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना, बुथ बांधणी चांगली केलीय. त्यामुळेच अभ्यास करुन हे पद दिलंय. तसेच विधानसभा निवडणुकीत ताकद मिळेल हेच यातून पाहिलंय. 

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाविषयी तुमचे मत काय? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर पवार म्हणाले, ‘अजून शिवेंद्रसिंहराजे हे भाजपात आले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी काय बोलणार?. सध्यातरी विधानसभेचा उमेदवार म्हणून मीच आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगतात शिवेंद्रसिंहराजे आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे पक्षात कोण येणार का ? म्हणून मी कशाला वाट पाहू. त्यांना भाजपमध्ये घ्यायचे असेल तर पक्ष आमच्याशी चर्चा करेल. त्यावेळी आमचे मत मांडू.  

गेल्या काही वर्षांपासून आमची निकामी आमदार हटाव म्हणून मोहीम सुरू आहे. जनतेनंही ठरवलंय आमदारांना हटवायचं. आमदारांनी आमदार निधीव्यतिरिक्त कोणतेच काम आणलं नाही. सातारा मतदारसंघातील जनतेच्या हातातच निकाल आहे. अमित कदम हे भाजपमध्ये आहेत. त्यांच्याबरोबरच आमचे घरचे संबंध आहेत. आमची बैठकही झालीय, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

मानकुमरे म्हणतात स्वाभिमानानं लढा; पण ते आमदारांचंच काम करणार...पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्याविषयी दीपक पवार यांनी भाष्य केले. मानकुमरे म्हणतात तुम्ही तालुक्यातील आहात. जोरदार व स्वाभिमानाने लढा असं त्यांनी सांगितलय. पण, ते शेवटी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचेच काम करणार, असेही पवार यांनी म्हटले.  

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसलेSatara areaसातारा परिसरBJPभाजपाPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस