शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

आ. ह. साळुंखे आणि जयसिंगराव पवार यांच्या लिखाणामुळे मी प्रभावित-सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 19:09 IST

सातारा : ‘ज्येष्ठ साहित्यिक आ. ह. साळुंखे आणि जयसिंगराव पवार यांच्या लिखाणामुळे मी प्रभावित झाले. त्यांचे सर्व साहित्य मी ...

सातारा : ‘ज्येष्ठ साहित्यिक आ. ह. साळुंखे आणि जयसिंगराव पवार यांच्या लिखाणामुळे मी प्रभावित झाले. त्यांचे सर्व साहित्य मी वाचत आहे, या दिग्गज साहित्यिकाची भेट घेण्याच्या उद्देशाने साताऱ्याला आले आहे,’ अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना साताऱ्यात धावता दौरा केला. शाहूपुरी येथील ज्येष्ठ साहित्यिक आ. ह. साळुंखे यांची त्यांच्या निवासस्थानी सुप्रियाताईंनी भेट घेऊन सुमारे सव्वा तास त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी आ. ह. साळुंखे यांचे चिरंजीव राकेश साळुंखे उपस्थित होते.या भेटीमध्ये त्यांनी आ. ह. साळुंखे यांच्या साहित्यकृती वाचलेले संदर्भ, आवडलेले पुस्तक आणि त्या साहित्यातील संदर्भाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवर सुमारे सव्वा तास चर्चा केली. या चर्चेचा रोख हा संपूर्णपणे साहित्याशी संबंधित होता.सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘ज्येष्ठ साहित्यिक आ. ह. साळुंखे यांचा व माझा परिचय फार पूर्वीपासून आहे. त्यांच्या साहित्याची मी पहिल्यापासून प्रशंसक आणि वाचक आहे. तात्यांचा नवनवीन साहित्यकृतींची मी नेहमीच माहिती घेत असते. या दौऱ्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता. या भेटीमध्ये मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून साहित्य संदर्भाच्या अनुषंगाने चर्चा केली.’दरम्यान, राष्ट्रवादी भवनला खासदार सुळे यांनी भेट दिली. आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांचे याठिकाणी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यावेळी उपस्थित होते.कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य बुद्धीला न पटणारेया ठिकाणीही पत्रकारांनी त्यांना महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, त्यांनी नाराजी व्यक्त केली. कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य हे बुद्धीला पटणारे नाही, असे त्या म्हणाल्या.कोरोना नावाखाली केंद्राकडून निधी नाहीकोरोनाचे कारण पुढे करून केंद्र सरकारने खासदारांचा निधी बंद केलेला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये खासदारांना निधीच दिला नाही. केंद्र सरकार निधी देतच नसल्यामुळे खासदारांना कामे करण्यात त्यांना मर्यादा येत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSupriya Suleसुप्रिया सुळे