शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला पेटवून तिचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा; घरगुती वादातून कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 20:14 IST

घरगुती कारणातून चिडून जावून राजू शिंदे याने दि. ९ जानेवारी २०१७ रोजी पत्नी सुनिताच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यात ती ९० टक्के भाजून गंभीर जखमी झाली होती. उपचार सुरुअसताना ११ जानेवारीला सुनिताचा मृत्यू झाला.

सातारा : लग्न झाल्यानंतर दुसर्‍याच वर्षी पत्नी सुनिता राजू शिंदे (वय-२८) हिला पेटवून देवून तिचा खून केल्याप्रकरणी राजेश उर्फ राजू गणपत शिंदे (३०, रा. खांबील पोकळे ता. महाबळेश्वर) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना २०१७ मध्ये घडली होती.याबाबत खटल्याची पार्श्वभूमी अशी, राजू शिंदे व सुनिता शिंदे यांचा विवाह झाल्यानंतर राजू पत्नीला वारंवार मानसिक त्रास देत होता. यातूनच शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण देखील करत होता. घरगुती कारणातून चिडून जावून राजू शिंदे याने दि. ९ जानेवारी २०१७ रोजी पत्नी सुनिताच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुनिताला उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. ती ९० टक्के भाजून गंभीर जखमी झाली होती. यादरम्यान पोलिसांनी तिचा जबाब देखील घेण्यात होता. दरम्यान, उपचार सुरुअसताना ११ जानेवारीला सुनिताचा मृत्यू झाला.याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात पती राजू शिंदे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. तत्कानीन सहायक पोलीस निरीक्षक देवीदास कठाळे यांनी तपास करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. आर्शीवाद कुलकर्णी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. मृत्यूपूर्व जबाब, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच शास्त्रोक्त व भौतिक पुरावा या खटल्यात महत्वूपर्ण ठरला. न्यायाधिशांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी राजू शिंदे याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. सातारा जिल्हा न्यायालयातील प्रॉसिक्युशन स्कॉडच्या पोलिसांनी यावेळी सहकार्य केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय