Satara Crime: पतीकडून पत्नीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:39 IST2025-11-07T15:39:04+5:302025-11-07T15:39:27+5:30
मानसिक त्रास देऊन छळले

संग्रहित छाया
सातारा : पतीने वर्षभरापूर्वी अश्लील व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची तक्रार पीडित विवाहितेने फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली असून, याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित विवाहिता फलटण तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. पीडित विवाहिता २६ वर्षांची आहे. तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, लग्नानंतर काही महिने पतीने व सासरच्या लोकांनी चांगले वागवले. परंतु काही महिन्यांतच पतीने दारू पिऊन मारहाण करण्यास सुरूवात केली. मानसिक त्रास देऊन पतीने छळले.
सुमारे एक वर्षांपूर्वी माझा अश्लील व्हिडीओ काढून तो व्हायरल केला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. मारहाणीबाबत सासू सासऱ्यांना कळविले असता त्यांनी त्यांची बाजू लावून धरली. या प्रकारानंतर त्रास असाह्य झाल्याने पीडित विवाहितेने ५ नोव्हेंबर रोजी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिस नाईक सागर अभंग हे अधिक तपास करीत आहेत.