शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

मोरणा पठारावर शेकडो ट्रक लाकूड तस्करी

By admin | Updated: November 9, 2015 23:29 IST

पाटण तालुका : जंगल तोडून पवनचक्क्यांना दिली जागा

पाटण : मोरणा पठारावरील शेकडो हेक्टर वनजमीन पवनचक्क्यांचे टॉवर उभे करण्यासाठी वनविभागाने दिली; मग त्या जमिनीतील हजारो झाडांची कत्तल स्वत: वनविभागाच्या देखरेखीखाली करण्यात आली. यांत्रिक कटरच्या साह्याने झाडे तोडून शेकडो ट्रक साठा करून त्या लाकडाचा लिलाव लाकूड तस्करांना केला. सध्या याच लाकूडसाठ्याची परवान्याच्या नावाखाली वाहतूक सुरू असून, कऱ्हाड, इस्लामपूर, सांगलीकडील वखारी व कारखान्याच्या बॉयलरला दुप्पट दराने लाकूड विकण्याचे काम सुरू आहे. पाटण वनविभाग व वनकर्मचाऱ्यांना सतत लाकूड तस्करी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी घेरले आहे. ज्यांच्या नावावर बेकायदा लाकूड तस्करी केल्याचे गुन्हे नोंद आहेत. तेच वनअधिकाऱ्यांच्या मर्जीतले आहेत. अशाच संबंधातून पाचगणी वनक्षेत्रातील शेकडो ट्रक लाकूडसाठा वनविभागाने तस्कऱ्यांना दिला आहे. तत्पूर्वी वनजमिनीतील उंच-उंच झाडे तोडताना वनविभागाचे हात थरथरले कसे नाहीत, असा सवाल जनतेतून केला जात आहे. दुसरीकडे मग सह्याद्री व्याघ्रप्रकल्प आणि इको सेन्सिटिव्ह झोनचे नाटक कशासाठी? अशा वर्दीतल्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी मोरणा परिसरातून होत आहे. (प्रतिनिधी)वनविभागाचे तपासणी नाके बनले वसुलीनाकेघाटमाथा, रासाटी, पाटण, नवारस्ता, विजयनगर अशा ठिकाणी वनविभागाने तपासणी नाके उभे केले आहेत. कऱ्हाड-चिपळूण रस्त्यावरील हे नाके खादाड बनले असून, हॉटेल्स, ढाब्याप्रमाणे दिवसा बंद आणि रात्र झाली की न चुकता उघडे असे चित्र दिसते. अशा नाक्यावरील कर्मचारी लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रककडून फक्त वसुली करण्याचे काम करताना दिसत असल्याच्या तक्रारी आहेत.पाचगणी वनक्षेत्रातील तो लाकूडसाठा व्यापाऱ्यांना लिलावाद्वारे विकला आहे. त्याची वाहतूक करण्यासाठी परवाना दिला आहे; पण रात्रीची वाहतूक केली जाते. याबाबत काही सांगता येणार नाही. - व्ही. आर. काळे, वनक्षेत्रपाल, पाटण