शहरं
Join us  
Trending Stories
1
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
2
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
3
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
4
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
5
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
6
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
7
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
8
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
9
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
10
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
11
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
12
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
13
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
14
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
15
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
16
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
17
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
18
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
19
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
20
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!

साताऱ्यात सापडला ऐतिहासिक ठेवा!, संवर्धनाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:51 IST

समर्थ मंदिर परिसरात विहीर दृष्टिक्षेपात

सातारा : मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या सातारा नगरीत इतिहासाच्या खुणा आजही जपल्या जात आहेत. याच शृंखलेतील एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक विहीर नुकतीच समर्थ मंदिर परिसरात इतिहास अभ्यासकांच्या दृष्टिक्षेपात आली आहे. ही विहीर रचनेत शुक्रवार पेठेतील सुप्रसिद्ध बाजीराव विहिरीप्रमाणे असून, तिच्या बांधकाम शैली, चिन्हे आणि शिल्पे यावरून ती छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यकाळातील असावी, असे मत इतिहास अभ्यासक नीलेश झोरे व अथर्व घोगळे यांनी व्यक्त केले आहे.

बाजीराव विहिरीशी साधर्म्य..शाहू महाराजांच्या काळात बांधलेल्या जलमंदिर पॅलेसजवळील बाजीराव विहिरी प्रमाणेच या विहिरीला देखील खाली उतरण्यासाठी सुंदर पायऱ्या आणि कमानी आहेत, जी तत्कालीन जलस्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना दर्शवते. इमारतींच्या गर्दीत अनेक वर्षे लपून राहिल्यामुळे ही अखीव-रेखीव आणि देखणी विहीर दुर्लक्षित राहिली होती.

ऐतिहासिक महत्त्व :छत्रपती राजाराम महाराजांनी राजधानी रायगडावरून किल्ले अजिंक्यतारा येथे आणली आणि याच किल्ल्यावरून छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा फडकला. शाहू महाराजांच्या काळात शहरात अनेक तलाव, हौद आणि विहिरी बांधल्या गेल्या, ज्या एकेकाळी सातारकरांची तहान भागवत होत्या. या विहिरी त्याच वैभवशाली जलव्यवस्थापन परंपरेचा भाग आहेत.

दुर्लक्षित वारसा; संवर्धनाची गरजदुर्दैवाने, हा ऐतिहासिक ठेवा सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे विहिरीच्या आत कचऱ्याचे साम्राज्य आणि अवतीभवती झुडपांची वाढ झाली आहे. यामुळे रस्त्यापासून अगदी जवळ असूनही ती सहजासहजी दिसत नाही. ज्या विहिरींनी एकेकाळी सातारकरांचे जीवन सुजलाम सुफलाम केले, आज त्यांचीच अवस्था बिकट झाली आहे.छत्रपती शाहू महाराज यांनी १७२० मध्ये सातारा शहराची स्थापना केली. शहराची रचना करताना गडाची पूर्वीची माची म्हणजे सध्याची नगरपालिका ते समर्थ मंदिर असाच वरचा सर्व भाग राजघराण्यासाठी राखीव होता. तेथे छत्रपती घराण्यासंबंधितच विहिरी बांधण्यात आल्या होत्या. वेशीवरच्या मारुती मंदिराजवळ आढळलेल्या या विहिरीची रचना पाहता ती शाहू महाराज कालीन असावी. पूर्वी या विहिरी पासून जवळच छत्रपतींचे सरदार डफळे यांचा वाडा होता. अशा विहिरी, हौद ही पूर्वीच्या शहराच्या पाणी व्यवस्थेचे पुरावेच म्हणता येतील. या विहिरीविषयी अजून ही माहिती घेण्याचे काम सुरू असून, हा अमूल्य ठेवा जतन करण्याची गरज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Historical Well Discovered in Satara: Preservation Needed Urgently!

Web Summary : A historical well, resembling Bajirao's well, was found near Satara's Samarth Temple. Believed from Chhatrapati Shahu Maharaj's era, it reflects advanced water management. Neglected for years, it requires immediate preservation to save Satara's heritage.