शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
3
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
4
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
5
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
6
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
7
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
8
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
9
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
10
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
11
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
12
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
13
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
14
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
15
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
16
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
17
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
18
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
19
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
20
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; धरणातील विसर्ग कमी, १२९ कुटुंबांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:01 IST

आठ मंडलांत अतिवृष्टी : नवजा ३८७, महाबळेश्वरला ३०८ मिलिमीटर पाऊस 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाधार सुरू असणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी दुपारनंतर कमी झाला. त्यामुळे प्रमुख धरणांतील विसर्गही कमी करण्यात आला आहे. तरीही सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे तब्बल ३८७ तर महाबळेश्वरला ३०८ मिलिमीटर पाऊस पडला. तसेच आठ महसूल मंडलांतही अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणच्या १२९ कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले.जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत होता. यामुळे पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. बुधवारी सकाळपर्यंत पाऊस सुरूच होता. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. यामुळे कोयना वगळता इतर प्रमुख धरणांतील विसर्गही कमी करण्यात आला आहे.तर सायंकाळच्या सुमारास कोयना धरणातून एकूण ९५ हजार ३०० क्युसेक पाणी विसर्ग सुरू होता. धरणाचे दरवाजे १३ फुटांवर स्थिर होते. त्यामधून ९३ हजार २०० आणि पायथा वीजगृह २ हजार १०० असा विसर्ग सुरू होता. तर कोयनेसह प्रमुख सहा धरणांतून एकूण १ लाख २१ हजार ४११ क्युसेक पाणी सोडले जात होते. यामुळे नद्या दुथडी भरून वाहत होत्या.

सहा धरणांत १४३ टीएमसी पाणीसाठा..कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. धरण क्षेत्रात पाऊस असल्याने सायंकाळच्या सुमारास धरणांमध्ये १४२.८५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ही धरणे ९६ टक्के भरली होती.

पाच तालुक्यांतील रस्ते तात्पुरते बंद..सोमवारपासून मुसळधार पाऊस होत असल्याने मंगळवारपासून अनेक तालुक्यांत काही मार्ग बंद आहेत. यामध्ये पाटण तालुक्यातील चार मार्गांचा समावेश होता. तर महाबळेश्वरसह वाई, सातारा आणि खंडाळा तालुक्यांतील काही मार्ग बंद होते. तर पाटण तालुक्यात २५, कराड ६, महाबळेश्वर ८, वाई ४० आणि सातारा तालुक्यातील ५० कुटुंबांतील ३६१ लोकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आलेले आहे.

पसरणी, पाचगणी, तापोळ्याला अतिवृष्टी..बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील आठ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. सातारा तालुक्यात तासगाव मंडलात ७८, पाटण तालुक्यातील चाफळला ६६, वाई तालुक्यात पसरणी येथे ९५, कोरेगाव तालुक्यात वाठार किरोली ६९, महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर मंडल २७३, तापोळा १०९, पाचगणी ७३ आणि लामजला १७० मिलिमीटर पाऊस नोंद झाला.

कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयना धरणात १०१.४२ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण ९६.४० टक्के भरले आहे. तसेच सायंकाळी धरणात १ लाख ११ हजार १६६ क्युसेक वेगाने पाणी आवक सुरू होती. तर धरणाचे सहा वक्र दरवाजे १३ फुटांवर असून, त्यातून ९३ हजार २०० आणि पायथा वीजगृह २ हजार १००, असा एकूण ९५ हजार ३०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात होता.