Satara: मलकापूरसह परिसरात दमदार पाऊस, उपमार्गांवर सर्वत्र पाणीच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:50 IST2025-06-04T17:49:53+5:302025-06-04T17:50:14+5:30

पेरणीपूर्व मशागतींचा खोळंबा

Heavy rain in Malkapur Satara and other areas in water everywhere on the byways | Satara: मलकापूरसह परिसरात दमदार पाऊस, उपमार्गांवर सर्वत्र पाणीच पाणी

Satara: मलकापूरसह परिसरात दमदार पाऊस, उपमार्गांवर सर्वत्र पाणीच पाणी

माणिक डोंगरे

मलकापूर : गेल्या चार दिवसापासून उघडीप घेतलेल्या पावसाने मलकापूरसह परिसरात आज, बुधवारी दुपारी पुन्हा जोरदार हजेरी लावली. यामुळे उपमार्गांवर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. कराड-ढेबेवाडी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते.

मे महिन्यात अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले होते. गेल्या दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने वातावरणात कमालीचा उकाडा वाढला होता. दरम्यानच, आज दुपारी आकाशात ढग जमा होण्यास सुरवात झाली अन् जोरदार पाऊस सुरु झाला. बाघता बघता काही वेळेतच सर्वत्र पाणी पाणी झाले. पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला. मात्र, शेतातील ओल तशीच असल्यामुळे शेती कामाचा चांगलाच खोळंबा झाला आहे. 

पेरणीपूर्व मशागतींचा खोळंबा

मे महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. ऐन मशागतीतच शिवारात सर्वत्र पाणी झाले आहे. चार दिवसापासून पाऊस उघडला असला तरी शेतात कामे  करता येत नव्हती. अशातच आज, पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पेरणीपूर्व मशागतींचा खोळंबा झाला आहे. 

Web Title: Heavy rain in Malkapur Satara and other areas in water everywhere on the byways