Satara: महाबळेश्वरमध्ये धुवांधार पाऊस, चिखली गावच्या हद्दीत रस्ता गेला वाहून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:13 IST2025-06-19T13:12:22+5:302025-06-19T13:13:33+5:30

गेल्या २४ तासात किती झाली पावसाची नोंद.. जाणून घ्या

Heavy rain in Mahabaleshwar, road washed away in Chikhali village limits | Satara: महाबळेश्वरमध्ये धुवांधार पाऊस, चिखली गावच्या हद्दीत रस्ता गेला वाहून 

Satara: महाबळेश्वरमध्ये धुवांधार पाऊस, चिखली गावच्या हद्दीत रस्ता गेला वाहून 

अजित जाधव 

महाबळेश्वर : जून महिन्याच्या प्रारंभी उघडीप दिलेल्या पावसाने महाबळेश्वरमध्ये धुवांधार सुरूवात केली आहे. यामुळे ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार महाबळेश्वर शहरात गेल्या २४ तासात १८९ मिमी ७ इंच पावसाची नोंद झाली आहे.

मुसळधार पाऊस होत असल्याने  पर्यटन स्थळावरील सेल्फी पाईंट तसेच तालुक्यातील लिंगमळा धबधबा, भिलार धबधबा, अंबनळी व तापोळा घाटातील सर्व लहान मोठे धबधबे तसेच (तलाव, वाहत असलेले ओढे-नाले, पूल) अशा धोकादायक ठिकाणी जाणे पर्यटकांनी टाळावे असे अवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

महाबळेश्वरमध्ये पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. कडाक्याची थंडी, दाट धुक्यासह पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे वेण्णालेकच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. ओढे नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. पावसाचा  मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटकाची तुरळक गर्दी आहे. वेण्णालेकसह परिसर दाट धुक्यात हरवून गेला आहे.

प्रसिद्ध लिंगमळा धबधबा प्रवाहित झाला आहे. पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. दि. १ जून ते १८ जून या कालावधीत ४६५. ६ मिमी (१८.३३ इंच) पावसाची नोंद झाली आहे. तर आज अखेर पर्यत २४ तासात १८९ मिमी ७ इंच तर एकूण ६५५ मिमी २५ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे.

चिखली गावच्या हद्दीत रस्ता गेला वाहून 

मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर तापोळा रस्ता चिखली गावच्या हद्दीत वाहून गेला. दरम्यान दरड कोसळलेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड माती काढण्याचे काम सुरू आहे. यामार्गावरील वाहतूक मांघर मार्गे झोंळखिंड वळविण्यात आली आहे.

Web Title: Heavy rain in Mahabaleshwar, road washed away in Chikhali village limits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.