शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

चक्क डोकं आपटून म्हणे,’ ती मी नव्हेच!’

By admin | Updated: November 6, 2014 22:58 IST

धस कॉलनीत अजब प्रकार : संशयित शेळी चोर महिलेचा थयथयाट पाहून पोलीसही गपगार

सातारा : येथील धस कॉलनीमध्ये शेळी चोरण्याच्या उद्देशाने आलेल्या महिलेला काही नागरिकांनी पकडले. त्यामुळे त्या महिलेने स्वत:चे डोके दगडावर आपटल्याने ती महिला जखमी झाली. संशयित महिलेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार गुरुवारी दुपारी घडला.मंगळवार पेठेतील धस कॉलनीमध्ये एक महिला दुपारी संशयितरीत्या फिरत होती. काही महिला आणि नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास आला. शेळी चोरण्याचा प्रयत्न करत असतानाच काही नागरिकांनी तिला पकडल्याचे पोलिसांनी सांगितले. कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यामुळे त्या महिलेने आरडाओरडा केली. त्यानंतर तिने स्वत:चे डोके दगडावर आपटून घतले. हा प्रकार पाहून काही महिला घाबरून गेल्या. त्या महिलेने जमिनीवरच लोळण घेतले. काहींनी शाहूपुरी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलीसही तत्काळ घटनास्थळी आले. पोलीस जीपमधून त्या महिलेला शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्या महिलेची चौकशी केली असता, ती संबंधित महिला मंगळवेढा तालुक्यातील असून, मुले व पती तिच्याजवळ राहत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)चक्क डोकं आपटून म्हणे,’ ती मी नव्हेच!’धस कॉलनीत अजब प्रकार : संशयित शेळी चोर महिलेचा थयथयाट पाहून पोलीसही गपगारचोरी करण्याच्या उद्देशाने कॉलनीमध्ये आलेल्या संशयित महिलेला नागरिकांनी पकडून शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, ‘परत येतो,’ असे सांगून काही लोक निघून गेले आहेत, ते पुन्हा आलेच नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तक्रार असल्याशिवाय त्या महिलेवर गुन्हा दाखल कसा करणार, असा पोलिसांना मोठा प्रश्न पडला आहे. ज्या लोकांनी त्या महिलेला पकडले. त्यांच्या मोबाईलवर अनेकदा पोलिसांनी फोन केले. परंतु त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचेही शाहूपुरी पोलिसांनी सांगितले. केवळ आरोपीला पकडून काहीच उपयोग होत नसतो, तक्रार दिली तरच त्याच्यावर कारवाई होत असते. हे नागरिकांना कोण सांगणार.