शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

हजारमाचीत सरपंच, उपसरपंच निवडीत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:52 IST

ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मंगळवारी ही निवडणूक प्रक्रिया झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंकज हलकंदकर, तर सहायक म्हणून तलाठी एस. जी. ...

ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मंगळवारी ही निवडणूक प्रक्रिया झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंकज हलकंदकर, तर सहायक म्हणून तलाठी एस. जी. मर्ढेकर, सचिव एन. व्ही. चिंचकर यांनी काम पाहिले.

हजारमाची ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी विद्या मधुकर घबाडे, पिंताबर आबा गुरव, तर उपसरपंचपदासाठी प्रशांत आत्माराम यादव, संगीता रवींद्र डुबल यांनी अर्ज दाखल केले होते. निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर अर्जाची छाननी होऊन सर्व अर्ज वैध ठरले. अर्ज कोणीही मागे न घेतल्याने अखेर मतदान घेण्यात आले. त्यामध्ये सरपंचदाच्या निवडणुकीत विद्या घबाडे यांनी ९ मते, तर पितांबर गुरव यांना ८ मते मिळाली. त्याचप्रमाणे उपसरपंचपदाच्या निवडणुकीत प्रशांत यादव यांना ९, तर संगीता डुबल यांना ८ मते मिळाली. त्यानंतर विद्या घबाडे यांना सरपंच, तर प्रशांत यादव यांना उपसरपंच म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी पंकज हलकंदकर यांनी घोषित केले. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

दरम्यान, निवडीनंतर सरपंच विद्या घबाडे व उपसरपंच प्रशांत यादव यांचा निवडणूक निर्णय अधिकारी पंकज हलकंदकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सर्वांना बरोबर घेऊन गटतट न मानता हजारमाची गावच्या विकासासाठी विविध योजना, उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे नूतन सरपंच विद्या घबाडे व उपसरपंच प्रशांत यादव यांनी सांगितले.

फोटो : २४केआरडी०१

कॅप्शन : हजारमाची (ता. कऱ्हाड) येथे सरपंचपदी विद्या घबाडे व उपसरपंचपदी प्रशांत यादव यांची निवड झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला.