फलटणमध्ये बंगल्यातून गुटख्याची पोती, रोकड जप्त, पोलीस व अन्न, औषध प्रशासन विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 15:55 IST2018-02-07T15:51:24+5:302018-02-07T15:55:52+5:30
फलटण शहरातील लक्ष्मीनगर परिसरात असणाऱ्या एका बंगल्यात बुधवारी सकाळी पोलीस व अन्न, औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत बंगल्यातून गुटख्याची पोती, रोख पैसे, दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फलटणमध्ये बंगल्यातून गुटख्याची पोती, रोकड जप्त, पोलीस व अन्न, औषध प्रशासन विभागाची कारवाई
फलटण : शहरातील लक्ष्मीनगर परिसरात असणाऱ्या एका बंगल्यात बुधवारी सकाळी पोलीस व अन्न, औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत बंगल्यातून गुटख्याची पोती, रोख पैसे, दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी शहरातील एका बंगल्यात गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस व अन्न, औषध प्रशासन विभागाच्या पथकाने संबंधित बंगल्यावर छापा टाकला.
अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता या ठिकाणी न गुटख्याची पोती, रोख पैसे, दागिने असा मुद्देमाल आढळून आला. जप्त केलेल्या मुद्देमालाचे मोजमाप सुरू असून, या कारवाईमुळे शहरातील दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
सध्या फलटण शहरात गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे. एक महिन्यापूर्वी जिंती नाका येथे पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईतही गुटखा जप्त करण्यात आला होता.