औरंगाबादेत जप्त केलेला गुटख्याची परस्पर विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:49 PM2018-02-06T23:49:51+5:302018-02-06T23:49:59+5:30

जप्त केलेला गुटखा आणि तंबाखूची परस्पर विल्हेवाट लावल्याबाबत गुन्हा दाखल झालेले पोलीस विभागातील तत्कालीन मुद्देमाल कारकून तथा सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र आनंदराव शिरसाठ याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संगीतराव एस. पाटील यांनी फेटाळला.

Mutual disposal of Gutkhta seized in Aurangabad | औरंगाबादेत जप्त केलेला गुटख्याची परस्पर विल्हेवाट

औरंगाबादेत जप्त केलेला गुटख्याची परस्पर विल्हेवाट

googlenewsNext
ठळक मुद्देयाचिका : सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा अटकपूर्व जामीन नामंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जप्त केलेला गुटखा आणि तंबाखूची परस्पर विल्हेवाट लावल्याबाबत गुन्हा दाखल झालेले पोलीस विभागातील तत्कालीन मुद्देमाल कारकून तथा सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र आनंदराव शिरसाठ याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संगीतराव एस. पाटील यांनी फेटाळला.
याबाबत चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन, धुळे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २० एप्रिल २०१७ रोजी गुप्त सूचनेवरून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक के.जी. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यप्रदेशातून आलेल्या दोन बसची तपासणी केली असता, त्यात १० लाख ३६ हजार ६०० रुपये किमतीचा गुटखा आढळला. पोलिसांनी तो जप्त केला आणि या पथकाचा एक सदस्य राजेंद्र शिरसाठ याला तो अन्न आणि औषध प्रशासनाकडे देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी तो मुद्देमाल अन्न व औषधी विभागाकडे दिला. दुसºया दिवशी उपनिरीक्षक तडवी यांनी अन्न व औषध विभागाला एक पत्र देऊन, मुद्देमाल परत करण्याची विनंती केली आणि राजेंद्र शिरसाठ यांच्यावर ते परत आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी तो माल अन्न व औषधी विभागाकडून परत घेतला; परंतु तो पोलीस ठाण्यात जामच केला नाही. या प्रकरणाच्या तपासात नंतर असेही आढळले की, अन्न व औषधी विभागाकडे हा माल दिला असता त्यांनी वजन आणि मोजणी केली तेव्हा तो ५ लाख ४६ हजार ८८२ रुपयांचाच होता. या प्रकरणी शिरसाठ यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी मुद्देमाल परस्पर लांबवून शासनाची फसवणूक केल्याचे आढळल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने अटकपूर्व जामिनासाठी खंडपीठात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणात उपनिरीक्षक तडवी आणि अर्जदार शिरसाठ यांची भूमिका संशयास्पद असल्याचे मत नोंदवीत खंडपीठाने राजेंद्र शिरसाठचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. या प्रकरणी अर्जदारातर्फे अ‍ॅड. पी.डी. बचाटे, तर शासनातर्फे अ‍ॅड. रश्मी गौर यांनी काम पहिले

Web Title: Mutual disposal of Gutkhta seized in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.