गुंड बंटी जाधवच्या साथीदारांकडून कारागृहात राडा, पिस्तूल पुरविणाऱ्यावर केला हल्ला

By दीपक शिंदे | Updated: August 14, 2023 13:52 IST2023-08-14T13:50:06+5:302023-08-14T13:52:00+5:30

हा प्रकार कारागृहातील पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला

Gund Bunty Jadhav accomplices attack on pistol supplier in satara jail | गुंड बंटी जाधवच्या साथीदारांकडून कारागृहात राडा, पिस्तूल पुरविणाऱ्यावर केला हल्ला

गुंड बंटी जाधवच्या साथीदारांकडून कारागृहात राडा, पिस्तूल पुरविणाऱ्यावर केला हल्ला

सातारा : भुईंज (ता. वाई) येथील गुंड बंटी जाधव याच्या सहकाऱ्यांनी पिस्तूल पुरवणाऱ्यांवर हल्ला केला. या घटनेने कारागृहात खळबळ उडाली. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुंड बंटी जाधव याच्यावर काही दिवसांपूर्वी वाई न्यायालयात गोळीबार झाला होता. हा गोळीबार राजेश नवघणे याने केला होता. यानंतर पोलिसांनी नवघणेसह त्याला पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांना वाई पोलिसांनी अटक केली होती. त्या दोघांनाही जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. 

दरम्यान, बंटी जाधवचे दोन साथीदारही कारागृहात आहेत. यातील एका साथीदाराने रविवारी दुपारी पिस्तूल पुरविणाऱ्या दोघांवर हल्ला केला. हा प्रकार कारागृहातील पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. सातारा शहर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: Gund Bunty Jadhav accomplices attack on pistol supplier in satara jail