शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
2
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
3
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
4
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
5
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
6
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
7
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
8
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
9
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
10
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
11
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
12
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
13
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
14
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
15
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
16
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
17
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
18
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
19
Monsoon 2026 Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही

By admin | Updated: April 27, 2016 00:54 IST

भारिपचा इशारा : दिसतील तिथे घेराव घालणार; दुष्काळप्रश्नावरून संतप्त वातावरण

सातारा : जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असताना पालकमंत्री विजय शिवतारे यांना त्याचे गांभीर्य नाही. त्यांनी उपाययोजना करण्याच्या हालचाली केल्या नाहीत. तर त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील वाई, जावळी, पाटण, सातारा तालुक्यातील डोंगराळ भागातील अनेक गावांना दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. त्याचबरोबर खटाव, माण, खंडाळा या कायमच दुष्काळग्रस्त असलेल्या भागांमध्ये आज पाण्याबरोबरच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, शासनाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पालकमंत्री शिवतारे यांना याचे गांभीर्य नाही.
ते युवक आघाडीने आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत होते. या बैठकीत विविध तालुक्यांतून आलेल्या युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती देऊन सरकारला जाब विचारण्याचा निश्चय केला आहे.
भारिप युवक आघाडीच्या वतीने शिवतारे जेथे सापडतील तेथे त्यांना घेराव घालून याबद्दल जाब विचारणार आहे, अशी माहिती सूरज गायकवाड, संतोष उघडे, बाळासाहेब कांबळे, दीपक सोनवणे, संतोष अंडागळे, अक्षय साळवी, मनोज गायकवाड, अक्षय भोसले आदी विविध तालुका युवा अध्यक्षांनी दिली. या बैठकीस मयुर गायकवाड, अनिल वानखेडे, आकाश भोसले, कमलाकर खंडागळे, संजय खंडागळे, सुमित उघडे, अजित कांबळे, रोहित रणबागले, जयवंत रणबागले, गोरक्षनाथ माने, विक्रम माने, अजय भोसले, संतोष कांबळे, प्रदीप कांबळे आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार जिल्हा युवक उपाध्यक्ष उमेश वाघमारे यांनी मानले. (प्रतिनिधी)