आॅनलाईन लोकमतसातारा , दि. 0१ : १ जुलै पासून वस्तू व सेवाकर कायदा लागू झाला आहे. त्याबातच्या शंकांचे निरसन करण्यासाठी वस्तू व सेवाकर विभागाच्या कार्यालयामध्ये जीएसटी सुविधा केंद्र उभारण्यात आले असून जे करदाते नव्याने कर भरण्यास पात्र होत आहेत त्यांना दि. ३० जुलै पर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती विक्रीकर उपआयुक्त यांनी दिली.ज्या करदात्यांना नव्याने नोंदणीसाठी अर्ज करावयाचा आहे. त्यांना वस्तू व सेवाकर विभागातील जीएसअी सुविधा केंद्र तसेच शासन मान्य ई-सेवा केंद्रातून मदत घेऊन सुध्दा आॅनाईन अर्ज करता येईल. वस्तू व सेवाकर कायद्याखाली सुरुवातीचे दोन महिने जीएसटीआर बी ३ या नमुन्यात विवरण पत्र तयार करण्यासाठीची युटीलीटी वस्तू व सेवाकर विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्व व्यापारी संघटना, उद्योग संघटना, इत्यादींनी आपल्या सभासदांच्या अडचणी एकत्रीत करुन वस्तू व सेवाकर विभागाकडे अथवा शासनाकडे सादर कराव्यात. तसेच या दिवसाचेऔचित्य साधून विक्रीकर भवन या कार्यालयाचे नाव वस्तू व सेवाकर भवन असे बदलण्यात येत आहे, अशी माहितीही विक्रीकर उपायुक्त यांनी दिली.
जीएसटी करदात्यांनी ३० जुलैपर्यंत अर्ज करावेत
By admin | Updated: July 1, 2017 18:13 IST