शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

उसाला एफआरपी अन् दुधाला दरवाढ द्या!

By admin | Updated: May 22, 2015 00:17 IST

कऱ्हाडात स्वाभिमानीचा ठिय्या : ‘कुमुदा-रयत’वर कारवाईची मागणी, मनोज घोरपडेंच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आक्रमक

कऱ्हाड : शासन निर्णयाप्रमाणे १४ दिवसांच्या आत ऊसदर देणे बंधनकारक असताना, कोल्हापूर जिल्हा सोडला तर इतर कोणत्याही साखर कारखान्याने ‘एफआरपी’प्रमाणे ऊसदर दिलेला नाही. तसेच रयत-कुमुदा साखर कारखान्याने उसाची १५ जानेवारीनंतर बिले शेतकऱ्यांना अदा केलेली नाहीत. त्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी. ‘एफआरपी’प्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, तसेच दुधाला दरवाढ द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी गुरुवारी कऱ्हाडात ठिय्या आंदोलन केले.येथील तहसील कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जमा होऊ लागले. ‘ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाचा बापाचा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो,’ आदी घोषणांनी परिसर दूमदुमून टाकला. कार्यकर्त्यांनी तेथे सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केले. त्यात मनोज घोरपेडेंसह देवानंद पाटील, सचिन नलवडे, अंजनकुमार घाडगे, धनाजी शिंदे, विकास पाटील, रोहित माने, बापूसाहेब साळुंखे, अमर कदम, राजेंद्र पाटील, संदीप पवार, कृष्णत क्षीरसागर, अमित शिंदे, जितेंद्र घोरपडे, प्रशांत कणसे, अविनाश घोरपडे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.दरम्यान, नायब तहसीलदार ज्ञानदेव डुबल यांच्याकडे संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात ‘एफआरपी’प्रमाणे ऊसदर न देणाऱ्या जिल्ह्यातील कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’प्रमाणे दर लवकरात लवकर मिळावा, गायीच्या दुधाला २५ रुपये तर म्हशीच्या दुधाला ३५ रुपये लिटरप्रमाणे भाव मिळावा, शासकीय नियमांप्रमाणे दर न देणाऱ्या खासगी व सहकारी दूध संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.(प्रतिनिधी)एकीकडे अर्ज तर दुसरीकडे निवेदनयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कृष्णा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. तर दुसरीकडे तहसील कार्यालय आवारात स्वाभिमानी संघटनेचे मनोज घोरपडे यांनी ऊसदराबाबत निवेदन देण्यासाठी आले असता. त्याठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमीच अग्रेसर असते. उसाला ‘एफआरपी’प्रमाणे दर व दुधाला दरवाढ मिळणे आज अत्यंत गरजेचे बनले आहे. मात्र, याकडे संबंधितांकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. आमच्या मागणीची लवकरात लवकर दखल न घेतल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत.-मनोज घोरपडे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते