Satara: वाटणीच्या वादातून नातवांनी केला आजोबांचा खून, डोक्यात घातला कुऱ्हाडीचा घाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 17:08 IST2024-12-31T17:02:44+5:302024-12-31T17:08:49+5:30

लोणंद पोलिसांनी दोन नातवांना घेतले ताब्यात

Grandson killed grandfather due to partition dispute in | Satara: वाटणीच्या वादातून नातवांनी केला आजोबांचा खून, डोक्यात घातला कुऱ्हाडीचा घाव

Satara: वाटणीच्या वादातून नातवांनी केला आजोबांचा खून, डोक्यात घातला कुऱ्हाडीचा घाव

लोणंद : घराची वाटणी करुन द्या या वादातून दोघा नातवांनी आजोबाच्या डोक्यावर कुऱ्हाडीचा घाव घातला. तर एकाने दगड मारला. यात सावता सरस्वती काळे (वय ७५ रा. सालपे, ता. फलटण) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी दोघा नातवांना ताब्यात घेतले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सालपे, ता. फलटण येथील फिर्यादी मिथुन काज्या काळे याचे आजोबा सावता काळे यांचा फिर्यादीचे सावत्र भाऊ दत्ता काज्या काळे, महेश राजा काळे (वय१९, दोघे रा. सालपे ता. फलटण) तसेच दत्ता यांचा सासरा अमित लवऱ्या शिंदे, (वय ३५, रा. मोड ता. खटाव) यांचा घराच्या वाटणीवरून वाद झाला. वादातून दत्ता काळे याने सावता काळे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून गंभीर जखमी केले व महेश काळे याने दगड मारला. यात सावता काळे यांचा जागीच मृत्यू झाला.

याबबातची फिर्याद मिथुन काळे याने लोणंद पोलिसांत दिली. सहायक पोलिस निरीक्षक सुशिल भोसले यांनी घटनास्थळी भेट देत तपास केली. तर, गुन्हातील आरोपी महेश काळे व अमित काळे या दोघांना ताब्यात घेतले. घटनास्थळी सातारा येथून फॉरेन्सिक टीमही दाखल झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले करीत आहेत.

Web Title: Grandson killed grandfather due to partition dispute in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.