शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
2
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
3
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
4
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
5
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
6
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
7
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
8
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
9
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
10
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
11
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
12
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
13
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
14
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
15
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
16
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
17
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
18
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
19
Monsoon 2026 Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा, विधानसभा इतकीच ग्रामसभा महत्त्वाची

By admin | Updated: April 26, 2016 00:27 IST

पंकजा मुंडे : ‘ग्राम उदय से भारत उदय’ अंतर्गत विशेष ग्रामसभा उत्साहात

दहिवडी : ‘लोकसभा आणि विधानसभा इतकीच ग्रामसभा महत्त्वाची असून, सलग चार वेळा ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करणाऱ्या लोधवडेचा आदर्श अन्य गावांनीही घ्यावा,’ असे आवाहन ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
माण तालुक्यातील लोधवडे येथे ‘ग्राम उदय से भारत उदय’ अंतर्गत तेथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकास मंत्री मुंडे बोलत होत्या. या ग्रामसभेला जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, जावेद शेख, कार्यकारी अभियंता दिलीप पालवे, गटविकास अधिकारी सीमा जगताप, सरपंच अर्पणा नष्टे, उपसरपंच मंदाकिनी कदम, सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री मुंडे म्हणाल्या, ‘ग्रामसभेला लोकशाहीमध्ये फार महत्त्व आहे. ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्या लोधवडे गावात बागायती शेती होत आहे, ही बाब अन्य गावांना प्रेरणा देणारी आहे. सगळ्या निवडणुकीत ग्रामपंचायतीची निवडणूक ही सर्वात अवघड असते. सलग चारवेळा लोधवडे गावाने बिनविरोध निवडणूक करून एक आदर्श निर्माण केला आहे. इतर गावांनीही हा आदर्श घेऊन आपल्या गावाचा विकास करावा. ’
गावे जलयुक्त करण्यासाठी सर्व गावांनी सहभाग द्यावा, असे आवाहन सचिव देशमुख यांनी यावेळी केले. सभेच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर गटविकास अधिकारी यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यानंतर दादासो चोपडे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय पंचायत राज दिनाची शपथ दिली. तसेच सभेचे विषयवाचन केले.
यावेळी सुकन्या योजनेंतर्गत मुलींच्या नावे १ हजार रुपयांच्या मुदत ठेव पत्राचे वाटप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या ग्रामसभेत राष्ट्रीय पंचातय राज दिनावेळी घ्यावयाची शपथ, राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त ग्रामसभेमध्ये शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांच्या माहितीचे वाचन, राष्ट्रीय पंचायत दिनाचे महत्त्व आणि ७३ व्या घटनादुरुस्तीने पंचायत संस्थांमध्ये झालेले बदल, १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत प्राप्त निधींच्या खर्चाचे नियोजन ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करणे, स्त्री भ्रूणहत्या, कुपोषण निर्मूलन, महिलांचा सहभाग, ग्रामविकासामध्ये योगदान, स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी व अन्य विकास योजनांची अंमलबजावणी सन २०१६-२०१७ साठी पाणी व पीक पद्धती ठरविणे आदी विषयांवर चर्चा करून मंजूर करण्यात आले.
या ग्रामसभेला ग्रामविकास अधिकारी नरेंद्र जगदाळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)