शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर बनले एसटीचे सारथी!

By admin | Updated: November 1, 2015 23:41 IST

उच्च शिक्षित बसचालकांची संख्या वाढली : राज्य परिवहन महामंडळच्या सातारा विभागात नव्याने १७० चालक रुजू

 जगदीश कोष्टी ल्ल सातारा एसटीतून प्रवास करत असताना चालकाशी होणारा वाद प्रवाशांना नवीन नाही. प्रवासीही अनेकदा निमूटपणे सहन करतात, त्यांना काही विचारलं तर, ‘यांच्या नादाला कोणी लागायचं. कमी शिक्षणामुळे कोणाशी कसं बोलायचं याची समज आलेली नसते,’ असं सांगितलं जातं; पण हा समज इतिहासजमा होण्यास आता वेळ लागणार नाही. एसटीच्या ताफ्यात पदवीधर युवक चालकपदी रुजू होत आहेत. कमी शिक्षणामुळे अनेकदा तरुणांसमोर चांगल्या नोकरीची संधी मिळत नाही. अशावेळी खासगी वाहनांवर चालक म्हणून काम केले जाते. रात्रंदिवस चालक म्हणून काम केले जात असल्याने त्यांची भाषा, कपडेही तसेच असतात. रात्री जागरण केल्यामुळे त्यांच्यात उत्साह फारसा जाणवत नाही. खासगी वाहनावर काम करत असतानाच काही चालक एसटी महामंडळात संधी मिळते का याची वाट पाहतात. अनुभवाच्या जोरावर त्यांना नोकरीही मिळते. मात्र, मानसिकता, वर्तन यात फारसा फरक पडत नाही. त्यातूनच प्रवाशांशी हुज्जत घातली जाते. त्यामुळे अनेक प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागासाठी चालक भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यातून गुणवत्तेनुसार भोसरी, येथील मध्यवर्ती चालक चाचणी केंद्रात संगणकावर एसटी चालविण्याची चाचणी घेण्यात आली. लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांच्या आधाराने पात्र चालकांना कागदपत्रे पडताळणीसाठी सातारा विभागात बोलाविण्यात आले होते. यशस्वी उमेदवारांमधून १७० उमेदवारांची चालक म्हणून निवडले. दिवाळी सण उत्पन्नाचा हंगाम असल्याने विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी चार गाड्या आठ निरीक्षक उपलब्ध करून प्रत्येक चालकाचे ४८ दिवसांचे एसटी विभागाअंतर्गत प्रशिक्षण दिले. विभाग नियंत्रण धनाजी थोरात यांनी दिलेल्या सूचनांनुसार पात्र उमेदवारांना एसटीतर्फे विनाथांबा प्रशिक्षण दिले आहे. यामध्ये नवरात्र, दसरा सणालाही सुटी घेतलेली नाही. ११ नोव्हेंबरपासून आमची टीम झटत आहे. - दत्तात्रय गोरे वाहतूक निरीक्षक प्रशिक्षण एसटीत भरती होऊन चालक होण्याचे स्वप्न लहानपणापासून पाहिले होते. २०१२ च्या भरतीत प्रयत्न केला. पण त्यावेळी परवाना नवीन असल्याने यश आले नाही. त्यामुळे नाराज न होता ट्रकवरच काम केले. त्यामुळे यंदाची भरती अवघड गेली नाही. - महेश जाधव, उंब्रज, प्रशिक्षक वाहन चालविण्याचा दहा वर्षांचा अनुभव असून, पीएमटीमध्ये दीड वर्षे चालक म्हणून काम केले. सातारा विभागात भरती निघाल्याने येथे प्रयत्न केला. मी कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले आहे. नियोजनाप्रमाणेच पारदर्शकपणेच काम झाले आहे. त्यामुळे एसटीत भरती झाल्याचे समाधान वाटत आहे. - उमेश शिंगणे, लिंब, गोवे सातारा, प्रशिक्षक