शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र उभारणार :रामराजे यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 05:24 PM2020-11-09T17:24:39+5:302020-11-09T17:26:43+5:30

Ramraje Naik-Nimbalkar, sataranews गोखळी, खटकेवस्ती, गुणवरे परिसरात कापसाचे क्षेत्र वाढत असून, तयार कापूस विक्रीची व्यवस्था नसल्याने सदर कापूस कवडी मोल किमतीला विकावा लागत आहे. हे स्पष्ट होताच शासकीय हमी भाव कापूस खरेदी केंद्र सुरू केले जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.

Government guarantees to set up cotton procurement center: Ramraje's testimony | शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र उभारणार :रामराजे यांची ग्वाही

शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र उभारणार :रामराजे यांची ग्वाही

Next
ठळक मुद्देशासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्र उभारणार :रामराजे यांची ग्वाही फलटण तालुक्यातील कापूर उत्पादकांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

फलटण : गोखळी, खटकेवस्ती, गुणवरे परिसरात कापसाचे क्षेत्र वाढत असून, तयार कापूस विक्रीची व्यवस्था नसल्याने सदर कापूस कवडी मोल किमतीला विकावा लागत आहे. हे स्पष्ट होताच शासकीय हमी भाव कापूस खरेदी केंद्र सुरू केले जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.

फलटण, बारामती, माळशिरस येथे चाळीस वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन होत असे, त्यातून येथे सहकारी व खासगी जिनिंग फॅक्टरी उभ्या राहिल्या. कोट्यवधी व्यापार, शेकडो हातांना काम, शेतकरी समाधानी अशी स्थिती होती. मात्र कापसावर आलेल्या बोंड आळी व अन्य रोगाने या भागातील कापूस पीक नामशेष झाल्याने शेती व व्यापार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले.

फलटण बारामती भागात कापूस उत्पादन सुरू आहे; पण विक्री नाही. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून बारामती, फलटण तालुक्यांत कापसाचे क्षेत्र वाढत असताना त्याच्या विक्रीची व्यवस्था नसल्याने त्याची कवडी मोलाने विक्री सुरू झाली आहे. पार्श्वभूमीवर ही बाब काही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी ते बोलत होते.

राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन अथवा महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे माध्यमातून येथे शासकीय हमी भाव कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर कापूस विक्रीची गडबड करू नका, शासकीय हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्याची ग्वाही रामराजे यांनी कापूस उत्पादकांना दिली आहे.

गोखळी, साठे, सरडे, गुणवरे, ढवळेवाडी परिसरात यावर्षी सुमारे तीनशे एकर क्षेत्रावर कापूस लागण झाली आहे. रास्त दर मिळाला नाही तर हे पांढरे सोने पुन्हा नामशेष होणार शासकीय हमीभाव प्रति क्विंटल ५८०० रुपये असताना सध्या केवळ चार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल दराने कापूस विक्री करावा लागत आहे.

यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, खटकेवस्तीचे सरपंच बापुराव गावडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी गावडे, विद्यमान संचालक संतोष खटके, गोखळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष मनोज गावडे, नवनाथ गावडे, योगेश गावडे, राजेंद्र भागवत, योगेश जाधव उपस्थित होते.

Web Title: Government guarantees to set up cotton procurement center: Ramraje's testimony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.