चोरीच्या गुन्ह्याचा एका तासात छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:35 IST2021-01-17T04:35:00+5:302021-01-17T04:35:00+5:30

याबाबत क्षितीज राजेंद्र शहा (रा. कल्याणी कॉलनी, शनिवार पेठ, कऱ्हाड) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ...

Get rid of theft in one hour | चोरीच्या गुन्ह्याचा एका तासात छडा

चोरीच्या गुन्ह्याचा एका तासात छडा

याबाबत क्षितीज राजेंद्र शहा (रा. कल्याणी कॉलनी, शनिवार पेठ, कऱ्हाड) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कोल्हापूर नाक्यावर क्षितीज शहा यांच्या मालकीचे संजय एजन्सीज नावाचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. आतील अडीच हजारांची रोकड, टॅब असा सुमारे वीस हजारांचा ऐवज लंपास केला. त्याच परिसरातील बापूराव बाजीराव पाटील यांच्या मालकीचे पान शॉप फोडून चोरट्यांनी मोबाईल चार्जर पळवला. याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात झाल्यानंतर गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक विजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन येळवे व सचिन साळुंखे यांनी तातडीने तपास करून एका तासातच याप्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Web Title: Get rid of theft in one hour