शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांना लुटणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:38 IST

लोणंद : सातारा-फलटण जाणाऱ्या मार्गावर प्रसाद स्टोन क्रशरजवळ असणाऱ्या निर्जन खिंडीत काही दिवसांपासून ट्रकचालकांना रस्त्यावर लाल रंगाचा जॅक ठेवून ...

लोणंद : सातारा-फलटण जाणाऱ्या मार्गावर प्रसाद स्टोन क्रशरजवळ असणाऱ्या निर्जन खिंडीत काही दिवसांपासून ट्रकचालकांना रस्त्यावर लाल रंगाचा जॅक ठेवून त्याचे आमिष दाखवून लुटण्याचे प्रकार घडत होते. याप्रकरणी एक टोळी लोणंद पोलिसांनी गजाआड केली.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, उपनिरीक्षक गणेश माने व ठाणे अंमलदार एक महिन्यापासून रात्र गस्त करून गोपनीय माहिती मिळवत होते. त्यानुसार दि. ११ रोजी रात्री सातारा ते फलटण जाणाऱ्या रोडवर पुनर्वसन येथे लाल जॅक व काही संशयित इसम असल्याची माहिती समजली. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई केली. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून अटक केली.

या दरोड्यातील रामदास बापू काळे, पिंटू शहाजी काळे, दशरथ लक्ष्मण काळे, तानाजी अशोक काळे, सचिन अशोक काळे (रा. पारा ता. वाशी जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून कोयता, दांडके, मिरचीपूड, दोरी, स्क्रू ड्रायव्हर, रॉड जप्त केले. ते ऊसतोडीसाठी आले असून ते दिवसभर काम करून रात्रीचे अशा प्रकारचे गुन्हे करण्यास सरसावले होते.