शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

Satara Crime: कुरिअर गाडीवरील दरोड्यातील सात जणांच्या टोळीला अखेर अटक; 24 लाखांचा मुद्देमाल जप्त

By दत्ता यादव | Published: May 30, 2023 11:51 AM

पुणे आणि सातारा पोलिसांची संयुक्त कामगिरी 

सातारा : एका कुरिअर कंपनीच्या वाहनाला अडवून त्यातील सोन्या-चांदीच्या नव्या दागिन्यांची लूट करून दरोडा टाकणाऱ्या सात सराईत संशयीतांच्या टोळीला सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या आत अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज,गुन्ह्यात वापरलेली गाडी व मोबाईल असा सुमारे २४ लाख ७२ हजार ८२० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.सरफराज सलीम नदाफ (वय ३४), मारुती लक्ष्मण मिसळ (वय २१), समीर धोंडिबा मुलाणी (वय २९) व रियाज दस्तगीर मुजावर (वय ३३, सर्व रा. कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सुरज बाजीराव कांबळे (वय २४) व करन सयाजी कांबळे (वय ३४, दोघे रा. सावर्डे, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर), गौरव सुनील घाटगे (वय २३, रा. मिणचे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोल्हापूर येथील एका कुरिअर कंपनीचे संतकुमार परमार व गोलू दिनेश परमार हे शनिवार, दि.27 रोजी रात्री १० च्या सुमारास साईनाथ एक्स्प्रेस कुरिअर कंपनीच्या पिकअप व्हॅनमध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पार्सल बॉक्स घेऊन पुण्याकडे निघाले होते. रविवारी रात्री अडीच वाजता काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत महामार्गावरील पुलावर त्यांच्या गाडीला चोरट्यांनी इनोव्हा गाडी आडवी मारली.त्यानंतर चोरट्यांनी वेदनाशामक औषधाच्या स्प्रेचा फवारा मारून त्यांना जबरदस्तीने गाडीतून खाली उतरविले. तसेच सोन्या-चांदीचे दागिने असलेले कुरिअर पार्सल बॉक्स  जबरदस्तीने हिसकावून दरोडा टाकून गाडीसह पसार झाले. याबाबत संतकुमार यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.गुन्ह्याच्या तपासासाठी सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, उनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथके तयार करण्यात आली होती.तांत्रीक विश्लेषण व मिळालेल्या माहितीच्या आधारे काही संशयीत पुणे येथे असल्याची माहिती समोर आली. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांना संशयीतांबााबत माहिती दिली.  त्यानुसार यवत पोलिस आणि सातारा पोलिसांनी  कासुर्डी टोलनाका येथे नाकाबंदी करून सर्व सात आरोपींच्या मुस्क्या आवळल्या. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, मोबाईल दागिने असा सुमारे 24 लाखांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर फुलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपअधीक्षक अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, पुणे ग्रामीण एलसीबीचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, कोल्हापूर एलसीबीचे निरीक्षक महादेव वाघमोडे, स्वप्नील लोखंडे, संतोष पवार, रविंद्र भोरे,बोरगावचे सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, हवालदार अतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, अमोल माने, राकेश खांडके, मोहन नाचण, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, शिवाजी भिसे, विक्रम पिसाळ, स्वप्निल माने, मयुर देशमुख, मोहसिन मोमिन, रोहित निकम, स्वप्निल दौंड, संकेत निकम, शिवाजी गरत आदींनी या कारवाईत भाग घेतला. 

तिन्ही जिल्ह्याचे पोलीस एकवटले...साताऱ्याजवळील बोरगाव हद्दीत दरोडेखोरांनी कुरिअरच्या गाडीला लुटल्यानंतर कोल्हापूर, सातारा आणि पुणे पोलिसांनी समन्वय साधून आरोपींचा माग काढला.अवघ्या २४ तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला. याबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस